कोलकाता, 25 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022 Eliminator) एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जाएंट्सचा (LSG vs RCB) कर्णधार केएल राहुलने (KL Rahul)टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. कोलकात्यामध्ये पाऊस असल्यामुळे टॉसला उशीर झाला. या सामन्यात लखनऊने टीममध्ये दोन बदल केले आहेत. कृष्णप्पा गौतम आणि जेसन होल्डर यांच्याऐवजी कृणाल पांड्या आणि दुष्मंता चमिरा यांचं टीममध्ये कमबॅक झालं आहे. तर आरसीबीने पुन्हा एकदा मोहम्मद सिराजला संधी दिली आहे.
दोन्ही टीमसाठी हा सामना करो या मरोचा आहे, कारण पराभूत होणाऱ्या टीमचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येणार आहे, तर जिंकलेली टीम राजस्थान रॉयल्सविरुद्ध क्वालिफायर-2 चा सामना खेळेल. क्वालिफायर-2 च्या सामन्यात विजय मिळवलेली टीम रविवार 29 मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध फायनल खेळणार आहे.
Live Score पाहण्यासाठी क्लिक करा
लखनऊची टीम
क्विंटन डिकॉक, केएल राहुल, एव्हिन लुईस, दीपक हुड्डा, कृणाल पांड्या, मनन व्होरा, मार्कस स्टॉयनिस, मोहसिन खान, आवेश खान, दुष्मंता चमिरा, रवी बिष्णोई
आरसीबीची टीम
फाफ डुप्लेसिस, विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जॉश हेजलवूड, मोहम्मद सिराज
पावसामुळे आजचा सामना रद्द करावा लागला, तर लखनऊ सुपर जाएंट्सची टीम क्वालिफायर-2 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळेल. आयपीएलच्या नियमानुसार प्ले-ऑफचा सामना रद्द करावा लागला तर पॉईंट्स टेबलमध्ये वरच्या क्रमांकावर असलेली टीम पुढे जाते. लीग स्टेजनंतर लखनऊची टीम पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या आणि आरसीबी चौथ्या क्रमांकावर होती. लखनऊने 14 पैकी 9 मॅच जिंकल्या होत्या, तर आरसीबीला 14 पैकी 8 मॅच जिंकता आल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.