Home /News /sport /

IPL 2022 : दिल्लीमध्ये ALL IS NOT WELL, पंतनं पराभवानंतर काढला 'या' खेळाडूंवर राग

IPL 2022 : दिल्लीमध्ये ALL IS NOT WELL, पंतनं पराभवानंतर काढला 'या' खेळाडूंवर राग

दिल्लीचा या सिझनमधील (IPL 2022) हा सलग दुसरा पराभव आहे. दिल्लीनं पहिल्यांदा बॅटींग करत पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) आक्रमक अर्धशतकानंतरही निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 3 आऊट 149 रन केले.

    मुंबई, 8 एप्रिल : पहिल्या आयपीएल विजेतेपदाच्या निर्धारानं उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सलग दुसरा पराभव झाला आहे. गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये लखनऊ सुपर जायंट्सनं (Lucknow Super Giants) दिल्लीचा 6 विकेट्सनं पराभव केला. दिल्लीचा या सिझनमधील (IPL 2022) हा सलग दुसरा पराभव आहे. दिल्लीनं पहिल्यांदा बॅटींग करत पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) आक्रमक अर्धशतकानंतरही  निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 3 आऊट 149 रन केले. त्यानंतर लखनऊनं हे लक्ष्य 2 बॉल आणि 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh Pant) या पराभवानंतर चांगलाच निराश झाला होता. दिल्लीकडून पृथ्वी शॉने 34 बॉलमध्ये 9 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 61 रन काढले. कॅप्टन ऋषभ पंतनं 39 आणि सर्फराज अहमदनं 36 रन करत नाबाद 75 रनची भागिदारी केली. त्यानंतरही दिल्लीला मोठा स्कोर करता आला नाही. लखनऊचा विकेट किपर क्विंटन डी कॉकनं 80 रनची खेळी करत मॅच त्याच्या टीमकडं झुकवली. आयुष बदोनीनं शेवटी सिक्स मारत विजयावर शिक्कामोर्तब केले. कॅप्टन पंतनं या पराभवानंतर टीममधील बॅटर्सना दोष दिला आहे. 'या पद्धतीनं दव असेल तर तुम्ही तक्रार करू शकत नाही. आम्ही 10-15 रन कमी केले. आवेश खान आणि जेसन होल्डर यांनी ज्या पद्धतीनं पुनरागमन केलं, त्याचं संपूर्ण श्रेय त्यांना जातं.' पंत पुढे म्हणाला की, 'मॅचच्या शेवटच्या ओव्हरपर्यंत 100 टक्के खेळ करण्याचा निर्धार आम्ही दुसरी इनिंग सुरू होण्यापूर्वी केला होता. त्यानंतर निकाल काहीही लागला तरी ठीक. पॉवर प्ले चांगला गेला पण आम्हाला कोणतीही विकेट मिळाली नाही. आमच्या स्पिनर्सनी मिडल ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी केली, पण अखेर आम्हाला 10-15 रन कमी पडले.'  असे सांगत पंतनं टीमच्या बॅटींगवर नाराजी व्यक्त केली. IPL 2022 : लखनऊला 22 वर्षांच्या मुलानं मिळवून दिला धोनी स्टाईल विजय, प्रत्येक मॅचमध्ये करतोय कमाल दिल्लीनं मुंबई इंडियन्सचा 4 विकेट्सनं पराभव करत या सिझनची विजयी सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांचा गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सकडून पराभव झाला आहे. दिल्लीची टीम पॉईंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. दिल्लीची पुढील मॅच 10 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi capitals, Ipl 2022, Rishabh pant

    पुढील बातम्या