जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : कुंबळेचा 'मास्टरस्ट्रोक' यशस्वी, 2 नव्या खेळाडूंनी फोडला CSK चा फुगा

IPL 2022 : कुंबळेचा 'मास्टरस्ट्रोक' यशस्वी, 2 नव्या खेळाडूंनी फोडला CSK चा फुगा

IPL 2022 : कुंबळेचा 'मास्टरस्ट्रोक' यशस्वी, 2 नव्या खेळाडूंनी फोडला  CSK चा फुगा

चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध पंजाब किंग्ज (Chennai Super Kings vs Punjab Kings) ही आयपीएल 2022 मधील मॅच अगदीच एकतर्फी झाली. पंजाबचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेनी (Anil Kumble) या मॅचमध्ये दोन बदल केले होते. ते बदल चांगलेच यशस्वी ठरले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध पंजाब किंग्ज (Chennai Super Kings vs Punjab Kings) ही आयपीएल 2022 मधील मॅच अगदीच एकतर्फी झाली. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडिअमवर झालेल्या या मॅचमध्ये पंजाबनं चेन्नईचा 54 रननं पराभव केला. पंजाबचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेनी (Anil Kumble) या मॅचमध्ये दोन बदल केले होते. ते बदल चांगलेच यशस्वी ठरले. पंजाबनं चेन्नई विरूद्धच्या मॅचमध्ये राज बावा आणि हरप्रीत ब्रार यांच्या जागी जितेश शर्मा (Jitesh Sharma) आणि वैभव अरोरा (Vaibhav Arora) या दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. शर्मा आणि वैभव यांनी पहिल्याच मॅचमध्ये दमदार कामगिरी करत बलाढ्य चेन्नई सुपर किंग्सच्या सामर्थ्याचा फुगा फोडला आहे. विदर्भाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणरा विकेट किपर जितेश शर्मानं (Jitesh Sharma) पहिल्याच मॅचमध्ये प्रभावित केले. शर्मानं सुरूवातीला 17 बॉलमध्ये 26 रनची महत्त्वपूर्ण खेळी केली.  आयपीएलमध्ये पहिलीच मॅच खेळणाऱ्या जितेशनं या खेळीत 3 सिक्स लगावले. त्यानंतर अंबाती रायुडूचा उजवीकडे झेपावत सुरेख कॅच पकडला. त्याचबरोबर त्यानेच आग्रह करत कॅप्टन मयांक अग्रवालला रिव्ह्यू घ्यायला लावला. त्यामुळे पंजाबला धोनीची विकेट मिळाली. हिमाचल प्रदेशकड़ून खेळणारा फास्ट बॉलर वैभव अरोरानं देखील पदार्पणात दमदार कामगिरी केली आहे. वैभव इनस्विंग आणि आऊटस्विंग दोन्ही उत्तम टाकतो, असं मयांकने मॅचपूर्वी सांगितले होते. त्याच्या बॉलिंगनं सीएसकेच्या टॉप ऑर्डरची चांगलीच परीक्षा घेतली. वैभवनं पहिल्याच ओव्हरमध्ये इनस्विंग आणि आऊटस्विंग बॉल टाकत कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवला. त्यानंतर त्यानं चेन्नईच्या इनिंगमधील तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिली आयपीएल विकेट घेतली. या स्पर्धेत फॉर्मात असलेल्या रॉबिन उथ्थप्पाला त्यानं आऊट केलं. लखनऊविरूद्ध आक्रमक अर्धशतक झळकावणारा उथप्पा 13 रन काढून आऊट झाला. त्यानंतर पाचव्या ओव्हरमध्ये वैभवनं सीएसकेला आणखी एक धक्का दिला. त्यानं ऑल राऊंडर मोईन अलीला शून्यावर आऊट केलं IPL 2022 : पहिली मॅच खेळणाऱ्या खेळाडूची हुशारी ठरली भारी, अंपायरला द्यावं लागलं धोनीला OUT वैभवनं 4 ओव्हर्समध्ये 21 रन देत 2 विकेट्स घेतल्या. त्यानं ‘पॉवर प्ले’ मध्ये दिलेल्या धक्क्यातून सीएसकेची टीम सावरलीच नाही. चार वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद मिळवणारी बलाढ्य टीम 18 ओव्हर्समध्ये 126 रनवरच ऑल आऊट झाली.  पंजाब किंग्जचा या स्पर्धेतील दुसरा विजय आहे. या विजयात दोन नवोदीत खेळाडूंचे महत्त्वाचे योगदान होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात