मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021, RCB vs SRH: जम्मू-काश्मीरचा Umran Malik बनला वेगाचा बादशाह; विराटने दिलं खास गिफ्ट

IPL 2021, RCB vs SRH: जम्मू-काश्मीरचा Umran Malik बनला वेगाचा बादशाह; विराटने दिलं खास गिफ्ट

IPL2021चा ‘नवा स्पीडस्टर’ ठरला जम्मू-काश्मीरचा हिरो

IPL2021चा ‘नवा स्पीडस्टर’ ठरला जम्मू-काश्मीरचा हिरो

IPL 2021 मध्ये बुधवारी झालेल्या SRH vs RCB या सामन्यानंतर क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त जम्मू-काश्मीरचा हिरो उमरान मलिक याची. बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीने देखील या नवख्या खेळाडूचं कौतुक केलं आहे..

  • Published by:  Dhanshri Otari
अबु धाबी, 07 ऑक्टोबर: आयपीएल (IPL 2021 Update) च्या 52 व्या सामन्यात अखेर हैदराबादच्या टीमला (IPL 2021 SRH vs RCB) विजय मिळाला आहे. बँगलोरविरुद्धचा (Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad) सामना त्यांनी 4 रनने जिंकला आहे. मात्र, क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त जम्मू-काश्मीरचा हिरो उमरान मलिक (umran malik bowls fastest ball of the tournament clocks 153) याची. सनरायझर्स हैदराबाद संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला 4 धावांनी पराभूत केले. दरम्यान सनरायझर्स हैदराबाद संघाकडून गोलंदाजी करत असलेल्या जम्मू काश्मीरच्या उमरान मलिकने आपलाच जुना विक्रम मोडून, नवीन विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. 21 वर्षीय उमरान मलिकने (Umran Malik New Record) RCB च्या डावाच्या 9 व्या षटकात 150 किमी प्रतितास वेगाने सलग पाच चेंडू टाकले. या दरम्यान, मलिकने या ओव्हरचा चौथा चेंडू 153 किमी प्रतितास वेगाने टाकून यंदाच्या मोसमातील सर्वात वेगवान चेंडू टाकणारा उमरान बादशाह बनला आहे. हे वाचा- T20 World Cup ची टीम निवडताना झाली चूक! निवड समितीच्या निर्णयावर दिग्गज नाराज उमरान मलिकने रचला इतिहास त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध खेळताना जेव्हा तो गोलंदाजीला आला त्यावेळी सर्वच क्रिकेट चाहते त्याची वेगवान गोलंदाजी पाहण्यासाठी उत्सुक होते. या सामन्यात केएस भरतला बाद करत त्याने आयपीएल स्पर्धेतील खाते उघडले. तसेच 9व्या षटकात त्याने एका पाठोपाठ 5 चेंडू त्याने 150 पेक्षा अधिक गतीने टाकले, ज्यामध्ये 153 किमी दर ताशी गतीचा चेंडू टाकताच त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. तो आयपीएल 2021 च्या हंगामात सर्वात वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी, मोहम्मद सिराज, 145.97 kph, हा आयपीएलमधील सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज होता. हे वाचा- ब्राव्होच्या मित्राचा CSK मध्ये समावेश, टीमला चॅम्पियन करण्याचा आहे अनुभव RCB संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिले खास गिफ्ट जम्मू -काश्मीरचा वेगवान गोलंदाज उम्रान मलिकने आतापर्यंत फक्त दोनच सामने खेळले असले तरी अल्पावधीतच सर्वांच्या मनावर चाल केली आहे. सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने उमरानचे कौतुक केले. ही स्पर्धा दरवर्षी नवीन टॅलेंट घेऊन येत असते. खेळाडूला 150 वर गोलंदाजी करताना पाहून बरे वाटते. मजबूत वेगवान गोलंदाज हे भारतीय क्रिकेटसाठी नेहमीच चांगले संकेत असतात. इतकेच नव्हे तर, विराटने खुश होत, मलिकला आपला ऑटोग्राफ असलेली जर्सी गिफ्ट म्हणून दिली.
First published:

Tags: IPL 2021

पुढील बातम्या