मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup ची टीम निवडताना झाली चूक! निवड समितीच्या निर्णयावर दिग्गज नाराज

T20 World Cup ची टीम निवडताना झाली चूक! निवड समितीच्या निर्णयावर दिग्गज नाराज

आयपीएल स्पर्धा (IPL 2021) झाल्यानंतर लगेच टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) सुरू होणार आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीखाली होणारी टीम इंडियाची ही शेवटची टी20 स्पर्धा आहे.

    मुंबई, 7 ऑक्टोबर : आयपीएल स्पर्धा (IPL 2021) झाल्यानंतर लगेच टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) सुरू होणार आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीखाली होणारी टीम इंडियाची ही शेवटची टी20 स्पर्धा आहे. या स्पर्धेत आयसीसी विजेतेपदाची प्रतीक्षा संपेल, अशी भारतीय क्रिकेटच्या फॅन्सना आशा आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीकडं सर्वांचं लक्ष आहे. निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांनी या वर्ल्ड कपसाठी टीम निवडताना कुठे चूक झाली ते सांगितलं आहे. 'माझ्या मते टीममध्ये एक फास्ट बॉलर कमी आहे. आपण बहुतेक लढती या दुबई आणि अबु धाबीमध्ये खेळणार आहोत. त्यामुळे टीममध्ये आणखी एक फास्ट बॉलर असता तर चांगले झाले असते. आपण शारजाहमध्ये मॅच खेळणार असतो तर ठीक होते. विशेषत: हार्दिक बॉलिंग करत नसल्यानं या गोष्टीला आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे. माझ्या मते ही काळजीची गोष्ट आहे.'  असं प्रसादनं सांगितलं. 'धोनी 'या' खेळाडूचा वर्ल्ड कप टीममध्ये समावेश करण्याची सूचना करणार' हार्दिकच्या बॉलिंगबद्दल प्रसाद यांनी सांगितले की, ' हार्दिकला ऑल राऊंडर म्हणून टीममध्ये निवडण्यात आलं आहे. बॅटर म्हणून नाही. त्याच्याकडे एक ऑल राऊंडर म्हणून पाहिले जाते. त्याला बॉलिंग न करण्याचे निर्देश दिले आहेत की त्याची बॉलिंग वर्ल्ड कपसाठी राखीव ठेवण्यात आली आहे, हे मला माहिती नाही. T20 World Cup आधी 4 भारतीय बॉलर तुफान फॉर्ममध्ये, एकावर टांगती तलवार! आपल्याला नेमकी परिस्थिती माहिती नाही. पण आदर्श परिस्थितीमध्ये त्याची ऑल राऊंडर म्हणून निवड केली जाते. तो बॉलिंग करताना पाहणे मला आवडेल.' प्रसाद यांनी यावेळी टी20 वर्ल्ड कपनंतर कॅप्टनसी सोडण्याच्या निर्णयाचंही समर्थन केलं. 'त्याच्यावर सर्व प्रकारच्या फॉर्मेटमध्ये कॅप्टनसी करण्याचा दबाव होता. ज्याचा परिणाम त्याच्या व्यक्तिगत प्रदर्शनावर झाला होता. माझ्या मते हा योग्य निर्णय आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, T20 world cup

    पुढील बातम्या