जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021: आयपीएल खेळण्यासाठी भारतात आलेल्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचा धक्का

IPL 2021: आयपीएल खेळण्यासाठी भारतात आलेल्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचा धक्का

IPL 2021: आयपीएल खेळण्यासाठी भारतात आलेल्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचा धक्का

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Australian PM Scott Morrison) यांनी आयपीएल (IPL 2021) खेळण्यासाठी आलेल्या त्यांच्या खेळाडूंना धक्का दिला आहे. आयपीएल खेळण्यासाठी गेलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ऑस्ट्रेलियात परतण्याची त्यांची व्यवस्था स्वत:च करावी लागणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मेलबर्न, 27 एप्रिल: ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Australian PM Scott Morrison) यांनी आयपीएल (IPL 2021) खेळण्यासाठी आलेल्या त्यांच्या खेळाडूंना धक्का दिला आहे. आयपीएल खेळण्यासाठी गेलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ऑस्ट्रेलियात परतण्याची त्यांची व्यवस्था स्वत:च करावी लागणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे ऑस्ट्रेलियाने भारतातून येणारी विमानसेवा 15 मेपर्यंत बंद केली होती. मॉरिसन द गार्डियन या वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले, ‘खेळाडू तिकडे वैयक्तिक प्रवासासाठी गेले आहेत. हा कोणत्याही ऑस्ट्रेलियन दौऱ्याचा भाग नाही, त्यांनी भारतात जायची स्वत:ची व्यवस्था केली, त्यामुळे परतण्याची व्यवस्थाही त्यांनीच करावी.’ ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू एन्ड्र्यू टाय (Andrew Tye), केन रिचर्डसन (Kane Richardson) आणि एडम झम्पा (Adam Zampa) यांनी भारतातल्या कोरोना संकटामुळे आयपीएल अर्धवट सोडून मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला. भारतात प्रत्येक दिवशी तीन लाखांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळत आहेत, तसंच 2 हजारांपेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. ऑस्ट्रेलियाचे 14 खेळाडू सध्या आयपीएल खेळत आहेत, याशिवाय प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग आणि सायमन कॅटिच, कॉमेंटेटर मॅथ्यू हेडन, ब्रेट ली, मायकल स्लेटर आणि लिजा स्थळेकर यांचा समावेश आहे. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) खेळाडू क्रीस लिन (Chris Lynn) याने आयपीएल संपल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने खेळाडूंना मायदेशात परतण्यासाठी विशेष विमानाची सोय करावी अशी मागणी केली आहे. आयपीएलच्या लीग स्टेज 23 मार्चला संपतील, तसंच फायनल 30 मे रोजी खेळवली जाणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) याबाबत वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि कॉमेंटेटर यांच्या संपर्कात आहोत. भारतातल्या परिस्थितीबाबत आम्ही त्यांच्याकडून माहिती घेत आहोत. या कठीण प्रसंगात आम्ही भारतीयांसोबत आहोत, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात