दुबई, 19 सप्टेंबर : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) या दोन चॅम्पियन टीमच्या महामुकाबल्याने आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या राऊंडला सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण हा निर्णय सीएसकेला चांगलाच महागात पडला. मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये ट्रेन्ट बोल्टने (Trent Boult) चेन्नईला धक्का दिला. यानंतर लगेचच पुढच्या ओव्हरमध्ये एडम मिल्ने (Adam Milne) यानेही दुसरी विकेट काढली.
चेन्नईची अवस्था 24/4 अशी होती आणि अंबाती रायुडू दुखापत झाल्यामुळे शून्य रनवरच रिटायर्ड हर्ट झाला होता, पण ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) रवींद्र जडेजा आणि मग ड्वॅन ब्राव्होच्या मदतीने चेन्नईला सावरलं. चेन्नईचे फाफ डुप्लेसिस आणि मोईन अली शून्य रनवर आणि सुरेश रैना 4 रन करून आऊट झाले, तरी ऋतुराजने एका बाजूने किल्ला लढवला.
मुंबईने उतरवलं 'सरप्राईज पॅकेज'! चेन्नईला बसला जोरदार झटका
ऋतुराज गायकवाडने 58 बॉलमध्ये केलेल्या नाबाद 88 रन केले. ऋतुराजच्या या खेळीमध्ये 9 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. 151 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने ऋतुराजने बॅटिंग केली, पण त्याला क्विंटन डिकॉकने जीवनदान दिलं. नवव्या ओव्हरमध्ये राहुल चहरच्या बॉलिंगवर डिकॉकने ऋतुराजचा कॅच सोडला. त्यावेळी चेन्नईची अवस्था 35/4 अशी होती.
पहिल्या 10 मिनिटांमध्येच Mumbai Indiansचे Chennai Super Kingsला दोन धक्के
डिकॉकने जीवनदान दिल्यानंतर मात्र ऋतुराज गायकवाडने मागे वळून पाहिलं नाही. ऋतुराजने पहिले रवींद्र जडेजासोबत 81 रनची आणि मग ब्राव्होसोबत 39 रनची पार्टनरशीप केली. 15 ओव्हरनंतर चेन्नईचा स्कोअर 87/4 असा होता, पण त्यांनी 20 ओव्हरमध्ये 156 रनपर्यंत मजल मारली. म्हणजेच शेवटच्या 5 ओव्हरमध्ये चेन्नईने 69 रन ठोकले. डिकॉकने तो कॅच पकडला असता तर चेन्नईला एवढा स्कोअरही करता आला नसता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.