दुबई, 19 सप्टेंबर : आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या राऊंडला युएईमध्ये सुरुवात झाली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (MI vs CSK) यांच्यात पहिला सामना रंगत आहे. या मॅचमध्ये चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण हा निर्णय ट्रेन्ट बोल्टने (Trent Boult) पहिल्याच ओव्हरमध्ये चुकीचा ठरवला. मॅचच्या पाचव्याच बॉलला फाफ डुप्लेसिस (Faf Du Plessis) आऊट झाला. डुप्लेसिसला या मॅचमध्ये एकही रन करता आली नाही. एडम मिल्नेने त्याचा कॅच पकडला. यानंतर पुढच्याच ओव्हरला एडम मिल्ने यानेच मोईन अलीला शून्यवर आऊट केलं. बोल्टने लगेचच पुढच्याच ओव्हरमध्ये रैनालाही माघारी पाठवलं फाफ डुप्लेसिसने आयपीएलच्या पहिल्या राऊंडमध्ये धमाकेदार कामगिरी केली होती. या मोसमातल्या 7 मॅचमध्ये 64 च्या सरासरीने त्याने 320 रन केले आहेत, यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने 29 फोर आणि 13 सिक्स फटकावले. फाफचा स्ट्राईक रेटही 145 चा आहे. नाबाद 95 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. चेन्नईविरुद्धच्या या सामन्यामध्ये टॉसआधीच मुंबईला दोन मोठे धक्के बसले. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे हा सामना खेळू शकले नाहीत. रोहित शर्माऐवजी कायरन पोलार्डकडे (Kieron Pollard) मुंबईचं कर्णधारपद आहे, तर हार्दिक पांड्याऐवजी अनमोलप्रीत सिंगने (Anmolpreet Singh) मुंबईकडून पदार्पण केलं. मुंबईचा लकी चार्म असलेल्या सौरभ तिवारी (Saurabh Tiwary) यालाही टीममध्ये संधी देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.