दुबई, 19 सप्टेंबर : आयपीएल 2021 च्या (IPL 2021) दुसऱ्या राऊंडला युएईमध्ये सुरुवात झाली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) या दोन चॅम्पियन टीमच्या महामुकाबल्याने स्पर्धा पुन्हा सुरू झाली, पण या मॅचआधीच मुंबई इंडियन्सना दोन मोठे धक्के बसले. मुंबईचे दोन महत्त्वाचे खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) या सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत. रोहित शर्माऐवजी कायरन पोलार्डकडे मुंबईचं कर्णधारपद आहे, तर हार्दिक पांड्याऐवजी अनमोलप्रीत सिंगने (Anmolpreet Singh) मुंबईकडून पदार्पण केलं. मुंबईचा लकी चार्म असलेल्या सौरभ तिवारी (Saurabh Tiwary) यालाही टीममध्ये संधी देण्यात आली आहे. मुंबईच्या टीममध्ये दुखापतींमुळे अनेक बदल झाले असले, तरी त्यांनी एक सरप्राईज पॅकेज मैदानात उतरवलं आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा नॅथन कुल्टर नाईल (Nathan Coulter Nile) खेळेल, असं बोललं जात होतं. पण न्यूझीलंडचा फास्ट बॉलर एडम मिल्ने (Adam Milne) याला मुंबईने मैदानात उतरवलं. आपल्या पहिल्याच आणि मॅचच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये मिल्नेने पहिली विकेट घेतली. धोकादायक मोईन अलीला (Moeen Ali) मिल्नेने शून्य रनवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. यानंतर त्याने पॉवर प्लेच्या शेवटच्या बॉलला एमएस धोनीचीही (MS Dhoni) विकेट घेतली. पहिल्या 10 मिनिटांमध्येच Mumbai Indiansचे Chennai Super Kingsला दोन धक्के एडम मिल्ने हा या वर्षात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या द हंड्रेडमध्ये (The Hundred) एडम मिल्नेने सर्वाधिक विकेट घेतल्या. बर्मिंघम फिनिक्सकडून खेळताना मिल्नेला 8 मॅचमध्ये 12 विकेट मिळाल्या. एवढच नाही तर त्याचा इकोनॉमी रेटही फक्त 5.73 एवढा कमी होता. एडम मिल्ने आयपीएलच्या पहिल्या राऊंडमध्ये मुंबईकडून एक मॅच खेळला होता, तर 2016-17 साली रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून (RCB) त्याला पाच आयपीएल मॅच खेळायला मिळाल्या होत्या. 2021 या वर्षात एडम मिल्ने याने सर्वाधिक टी-20 बॉल टाकले आहेत. टी-20 वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंडच्या राखीव खेळाडूंमध्येही मिल्नेची निवड झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.