Home /News /sport /

IPL 2021 Live Streaming: CSK vs MI चा मुकाबला, कधी आणि कुठे पाहता येणार?

IPL 2021 Live Streaming: CSK vs MI चा मुकाबला, कधी आणि कुठे पाहता येणार?

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या राऊंडला (IPL 2021) रविवार 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) यांच्यात दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना खेळला जाईल.

    दुबई, 18 सप्टेंबर : आयपीएल 2021 च्या दुसऱ्या राऊंडला (IPL 2021) रविवार 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) यांच्यात दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना खेळला जाईल. एमएस धोनीची (MS Dhoni) चेन्नई सुपरकिंग्स पॉईंट्स टेबलमध्ये 10 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर आयपीएल इतिहासातली सगळ्यात यशस्वी टीम असलेली मुंबई इंडियन्स 8 पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. या मोसमात जेव्हा या दोन्ही टीम आमने-सामने आल्या होत्या तेव्हा मुंबईने चेन्नईचा 4 विकेटने पराभव केला होता. चेन्नईला त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. दुसरीकडे मुंबईची टीम गतविजेती असली तरी त्यांना त्यांच्या नावाला साजेसा खेळ करता आलेला नाही. मुंबईच्या टीमला पहिल्या राऊंडमध्ये चेन्नईत झालेल्या 5 पैकी एकाही सामन्यात 160 रनचा टप्पा गाठता आला नव्हता. पण दिल्लीमध्ये येताच मुंबईने 172 रन आणि 219 रनचं आव्हान पार केलं. IPL 2021 : प्ले-ऑफ मध्ये पोहोचणं या 2 टीमसाठी सोपं, मुंबई अडचणीत! किती वाजता सुरू होणार मॅच? आयपीएल 2021 चा 30 वा सामना 19 सप्टेंबर रविवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. तर टॉस 7 वाजता होईल. आयपीएल 2021 चं लाईव्ह प्रसारण कुठे? आयपीएल 2021 चं लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार? आयपीएल 2021 च्या मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येणार आहे. जिओवरही पाहता येणार मॅच रिलायन्स जिओदेखील आपल्या ग्राहकांना आयपीएल मॅचची सुविधा देणार आहे. पोस्ट-पेड आणि प्री-पेड ग्राहकांना ही सुविधा मिळेल. जियोचे सगळे पोस्ट पेड ग्राहक आयपीएल मॅच फ्रीमध्ये पाहू शकतील. जिओ टीव्हीवर प्रेक्षकांना आयपीएल सामने पाहता येतील. IPL 2021 : मुंबईने 'ती' सवय बदलली नाही तर CSK होणार चॅम्पियन! रोहितसाठी धोक्याची घंटा
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, Mumbai Indians

    पुढील बातम्या