मुंबई, 29 सप्टेंबर : कोलकाता नाईट रायडर्सनं मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा (Kolkata Knight Riders vs Delhi Capitals) 3 विकेट्सनं पराभव केला. कोलकातानं हा विजय मिळवत टॉप 4 मधील जागा कायम ठेवली आहे. या मॅचमध्ये केकेआरचा (KKR) कॅप्टन इयन मॉर्गन (Eoin Morgan) आणि दिल्लीचा (DC) अनुभवी बॉलर आर. अश्विन (R. Ashwin) यांच्यात भर मैदानात वाद झाला होता. दोन दिग्गज खेळाडूंमध्ये झालेला हा वाद क्रिकेट विश्वातील चर्चेचा मुद्दा आहे. या वादाचं नेमकं कारण आता समोर आलं आहे.
काय घडले प्रकरण?
अश्विन आणि मॉर्गन यांच्या वादात केकेआरचा विकेट किपर -बॅट्समन दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) मध्यस्थी केली. कार्तिकनं अश्विनला दूर नेत हा वाद जास्त चिघळणार नाही, याची खबरदारी घेतली. मॅचनंतर पत्रकारांशी बोलताना कार्तिकनं दोघांमध्ये झालेल्या वादाचं कारण सांगितलं आहे.
दिल्लीची बॅटींग सुरू असताना राहुल त्रिपाठीनं थ्रो फेकला होता. तो थ्रो दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतला लागला आणि बॉल दूर गेला. अश्विननं या संधीचा फायदा घेत रन काढण्याचा प्रयत्न केला. पुढच्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर टीम साऊदीनं अश्विनला आऊट केलं.
अश्विन आऊट झाल्यानंतर परत जात असताना साऊदी त्याला काही तरी बोलला. त्यावेळी अश्विन त्याच्या दिशेनं केला. त्याचवेळी केकेआरचा कॅप्टन मॉर्गनही अश्विनकडे येत होता. त्यानंतर कार्तिकनं मध्यस्थी केली. त्यानं तामिळनाडू टीममधील आपल्या सहकाऱ्याला मैदानातून जाण्याचा आग्रह केला.
Nicepic.twitter.com/CQrOhdv8cG
— Aryan (@Kohlis_shadow) September 28, 2021
कार्तिक या सर्व विषयावर बोलताना म्हणाला की, 'माझ्या मते मॉर्गनला हे आवडलं नाही. बॉल चुकून बॅट्समनच्या बॅटला लागला असेल तर खेळ भावनेचा आदर करुन त्यावर रन काढू नये, अशी मॉर्गनची अपेक्षा आहे. हा एक वेगळा विषय आहे. याबाबत प्रत्येकाचं आपलं मत आहे. मी आत्ता इतकंच सांगेल की, हे प्रकरण शांत करण्याचं काम मी केलं, याचा मला आनंद आहे. आता सर्व गोष्टी ठीक झाल्या आहेत.'
VIDEO : पंतचा स्टंट पडला असता कार्तिकवर भारी! थोडक्यात टळला भयंकर अपघात
दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतनं या प्रकरणाला फार महत्त्व दिलं नाही. 'या सर्व गोष्टी खेळाच्या भाग आहे. दोन्ही टीम विजयाचा प्रयत्न करत होत्या. त्यावेळी हे प्रकरण घडलं,' असं अश्विननं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi capitals, KKR, R ashwin