मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: विजयाच्या जवळ येऊनही ‘दिल्ली’ दूरच, मॅच हरताच पंत, पृथ्वीचे अश्रू अनावर VIDEO

IPL 2021: विजयाच्या जवळ येऊनही ‘दिल्ली’ दूरच, मॅच हरताच पंत, पृथ्वीचे अश्रू अनावर VIDEO

संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या दिल्लीचा पराभव होताच त्यांचा कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh Pant),  ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) तसंच फास्ट बॉलर आवेश खान (Avesh Khan) यांना अश्रू अनावर झाले.

संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या दिल्लीचा पराभव होताच त्यांचा कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh Pant), ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) तसंच फास्ट बॉलर आवेश खान (Avesh Khan) यांना अश्रू अनावर झाले.

संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या दिल्लीचा पराभव होताच त्यांचा कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh Pant), ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) तसंच फास्ट बॉलर आवेश खान (Avesh Khan) यांना अश्रू अनावर झाले.

शारजाह, 14 ऑक्टोबर: आयपीएल फायनलमधील (IPL 2021 Final) दोन्ही टीम आता नक्की झाल्या आहेत. शारजाहमध्ये बुधवारी झालेल्या क्वालिफायर 2 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सन दिल्ली कॅपिटल्सचा (Kolkata Knight Riders) 3 विकेट्सनं पराभव केला. आता केकेआरची (KKR) फायनलमध्ये लढत चेन्नई सुपर किंग्सशी (Chennai Super Kings) शुक्रवारी होणार आहे. आयपीएल पॉईंट टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर असलेल्या दिल्लीचा (DC) ‘प्ले ऑफ’मध्ये सलग दुसऱ्यांदा पराभव झाल्यानं त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं.

या मॅचमध्ये दिल्लीच्या बॉलर्सनी शेवटच्या क्षणी अशक्य वाटणारा विजय खेचून आणला होता. दिल्लीला विजयासाठी शेवटच्या 2 बॉलमध्ये 6 रनची गरज होती. त्यावेळी अनुभवी आर. अश्विनच्या (R. Ashwin) बॉलवर पुणेकर राहुल त्रिपाठीनं (Rahul Tripathi) सिक्स लगावत एक बॉल राखून केकेआरला विजय मिळवून दिला. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या दिल्लीचा पराभव होताच त्यांचा कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh Pant),  ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) तसंच फास्ट बॉलर आवेश खान (Avesh Khan) यांना अश्रू अनावर झाले.

राहुल त्रिपाठीनं सिक्स मारताच पृथ्वी शॉ ला भावना आवरता आल्या नाहीत. तो मैदानातच खाली आडवा झाला. पृथ्वीला दिल्लीच्या अन्य सहकाऱ्यांनी दिलासा देत उठवलं. त्यावेळी अक्षर पटेललाही (Axar Patel) चांगलंच वाईट वाटत होतं.

राहुल त्रिपाठीनं सिक्स लगावताच केकेआरच्या कॅम्पमध्ये जल्लोष होता. आंद्रे रसेल, टीम साऊदी यांनी जोरदार सेलिब्रेशन केले. तर दिल्लीच्या डग आऊटमध्ये मात्र निराशा होती. आवेश खानला रडू आवरले नाही. तर मैदानात मोठ्या कष्टानं भावना आवरलेल्या कॅप्टन ऋषभ पंतला ड्रेसिंग रूममध्ये जाताच अश्रू अनावर झाले.

दिल्लीची बॅटींग ढेपाळली

दिल्ली कॅपिटल्सची निराशाजनक बॅटींग त्यांच्या पराभवाचं कारण ठरली. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटींगला आलेल्या दिल्लीकडून शिखर धवननं (Shikhar Dhawan) सर्वात जास्त 36 रन काढले. तर श्रेयस अय्यर 30 रन काढून नाबाद राहिला. दिल्लीच्या बॅटर्सना मोठा स्कोर करण्यात अपयश आले.

सुनील नारायणचा T20 वर्ल्ड कप टीममध्ये समावेश होणार का? वेस्ट इंडिजच्या कॅप्टननं दिलं उत्तर

केकेआरच्या स्पिनर्सनी त्यांना चांगलंच जखडून ठेवलं. त्यामुळे त्यांना 20 ओव्हर्समध्ये 5 आऊट 135 रनच करता आले. केकेआरकडून वरूण चक्रवर्तीनं (Varun Chakarvarthy) 26 रन्स देत 2 विकेट्स घेतल्या.

First published:

Tags: Delhi capitals, IPL 2021, Rishabh pant