Home /News /sport /

IPL Final 2021 : सलमान खान झाला या दोन खेळाडूंचा फॅन, पहिला ऋतुराज गायकवाड तर दुसरा...

IPL Final 2021 : सलमान खान झाला या दोन खेळाडूंचा फॅन, पहिला ऋतुराज गायकवाड तर दुसरा...

आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये (IPL 2021 Final) चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या (CSK vs KKR) टीम आमने-सामने आहेत. या महामुकाबल्याआधी बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) स्टार स्पोर्ट्सवर आला होता.

    दुबई, 15 ऑक्टोबर : आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये (IPL 2021 Final) चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या (CSK vs KKR) टीम आमने-सामने आहेत. या सामन्यात कोलकात्याचा कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. आयपीएल फायनलच्या या महामुकाबल्याआधी बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) स्टार स्पोर्ट्सवर आला होता. आयपीएलच्या या मोसमात आपल्याला सर्वाधिक कोणते खेळाडू आवडले, हे सलमानने या कार्यक्रमात सांगितलं. सलमान खानने आयपीएलच्या या मोसमात ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि आवेश खान (Avesh Khan) हे दोन खेळाडू आवडल्याचं सांगितलं. ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सकडून (CSK) तर आवेश खान दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळतात. IPL Final 2021 : धोनीच्या CSK कडून खेळला प्रत्येक फायनल, यावेळी मात्र दिग्गजाला मिळणार नाही संधी! आयपीएलच्या या मोसमात सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये ऋतुराज गायकवाड दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऋतुराजने 16 मॅचमध्ये 46.76 ची सरासरी आणि 137.86 च्या स्ट्राईक रेटने 608 रन केल्या, यामध्ये एक शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये 600 रनचा टप्पा ओलांडणारा ऋतुराज गायकवाड केएल राहुलनंतरचा (KL Rahul) दुसरा खेळाडू आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा फास्ट बॉलर आवेश खान या वर्षी आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. आवेश खानने 16 मॅचमध्ये 18.75 ची सरासरी आणि 7.37 च्या इकोनॉमी रेटने 24 विकेट घेतल्या. 13 रनवर 3 विकेट आवेश खानची यंदाच्या मोसमातली सर्वोत्तम कामगिरी आहे. आवेश खानपेक्षा जास्त विकेट आरसीबीच्या हर्षल पटेलने (Harshal Patel) घेतल्या. पटेलला या मोसमात 15 मॅचमध्ये 32 विकेट मिळाल्या.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, KKR, Salman khan

    पुढील बातम्या