Home /News /sport /

IPL 2021 Breaking: मॅचच्या एक दिवस आधी दिल्लीचा बॉलर कोरोना पॉझिटिव्ह, रबाडाबरोबर केला होता 7 तासांचा प्रवास

IPL 2021 Breaking: मॅचच्या एक दिवस आधी दिल्लीचा बॉलर कोरोना पॉझिटिव्ह, रबाडाबरोबर केला होता 7 तासांचा प्रवास

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या मॅचच्या एक दिवसआधी दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचा फास्ट बॉलर एनरिक नॉर्कियाला (Enrich Nortje) कोरोनाची लागण झाली आहे.

    नवी दिल्ली, 14 एप्रिल: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या मॅचच्या एक दिवसआधी दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचा फास्ट बॉलर एनरिक नॉर्कियाला (Enrich Nortje) कोरोनाची लागण झाली आहे. कसिगो रबाडा (Kagiso Rabada) याने देखील नॉर्खियाबरोबर सात तासांचा प्रवास एकत्र केला होता, मात्र त्याची कोरोना चाचणी  निगेटिव्ह आली आहे. दोन्ही खेळाडू सध्या मुंबईमध्ये क्वारंटाइन असल्याची माहिती मिळते आहे. दैनिक भास्करने याबाबत वृत्त दिले आहे. आयपीएल किंवा दिल्ली कॅपिटल्सकडून या वृत्तास अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही. नॉर्खिया पॉझिटिव्ह आल्याने दिल्लीच्या अडचणी वाढल्या आहे. दुखापतग्रस्त श्रेयस अय्यर (Shreyas Iyer Injury) आयपीएलचा हा हंगाम खेळू शकत नसल्याने कर्णधारपदाची धुरा रिषभ पंतकडे (Rishabh Pant) आली आहे. पहिल्या सामन्यात धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जला हरवल्यानंतर रिषभ पंतच्या या टीमचा आत्मविश्वास वाढला होता. मीडिया अहवालानुसार रबाडा आणि एनरिक हे दोन्ही खेळाडू 4 एप्रिल रोजी जोहान्सबर्गमध्ये पाकिस्तानविरोधात दुसरी वनडे खेळले आणि 5 एप्रिल रोजी आयपीएल 2021 खेळण्यासाठी ते मुंबईकडे रवाना झाले. (हे वाचा-पाकिस्तानी क्रिकेटपटूचा झिम्बाब्वेला जायला नकार, कारण ऐकून हैराण व्हाल!) 6 एप्रिल रोजी मुंबईत दाखल झाल्यानंतर ते BCCI च्या कोरोना प्रोटोकॉलअंतर्गत (BCCI Corona Protocol) सात दिवसांसाठी क्वारंटाइन होते. मीडिया अहवालानुसार 12 एप्रिल रोजी नॉर्कियाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आणखी एक माहिती समोर येते आहे की जरी रबाडाचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये तो खेळताना दिसणार नाही आहे, कारण त्याने नॉर्कियाबरोबर सात तास विमानप्रवास केला होता. गेल्यावर्षी दिल्लीच्या संघामध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या रबाडा आणि नॉर्कियाला दिल्लीने याहीवर्षी संधी दिली आहे. मात्र आता नॉर्किया कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे तर रबाडाने त्याच्याबरोबर प्रवास केल्याने दोन्ही खेळाडूंची धडाकेबाज गोलंदाजी पाहण्यासाठी दिल्लीच्या चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Corona, Corona spread, Delhi, Delhi capitals, IPL 2021

    पुढील बातम्या