Home /News /sport /

पाकिस्तानी क्रिकेटपटूचा झिम्बाब्वेला जायला नकार, कारण ऐकून हैराण व्हाल!

पाकिस्तानी क्रिकेटपटूचा झिम्बाब्वेला जायला नकार, कारण ऐकून हैराण व्हाल!

पाकिस्तानचे क्रिकेटपटू (Pakistan Cricket) कधी काय करतील आणि चर्चेत येतील याचा नेम नसतो. अनेकवेळा चुकीच्या कारणांमुळे पाकिस्तानी खेळाडू सोशल मीडियावर ट्रोल झाल्याचं आपण अनेकवेळा पाहिलं आहे, यामध्ये आता त्यांचा लेग स्पिनर झाहिद महमूद (Zahid Mahamood) याचं नावही आलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 14 एप्रिल: पाकिस्तानचे क्रिकेटपटू (Pakistan Cricket) कधी काय करतील आणि चर्चेत येतील याचा नेम नसतो. अनेकवेळा चुकीच्या कारणांमुळे पाकिस्तानी खेळाडू सोशल मीडियावर ट्रोल झाल्याचं आपण अनेकवेळा पाहिलं आहे, यामध्ये आता त्यांचा लेग स्पिनर झाहिद महमूद (Zahid Mahamood) याचं नावही आलं आहे. शादाब खानला (Shadab Khan) दुखापत झाल्यामुळे झाहिद महमूद याची झिम्बाब्वे दौऱ्यासाठीच्या टीममध्ये निवड झाली, पण त्याने झिम्बाब्वेला (Pakistan vs Zimbabwe) जायलाच नकार दिला आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र द न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार महमूदने झिम्बाब्वे दौऱ्यावर जायला नकार दिला कारण तो कधीच परदेशात गेलेला नाही. विमानामध्ये आपल्याला एकट्याला भीती वाटते, असं त्याने सांगितलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही महमूदचं स्पष्टीकरण मान्य केलं. महमूद आता टेस्ट टीमसोबत 21 एप्रिलला हरारेसाठी रवाना होणार आहे. पाकिस्तानची टीम सध्या दक्षिण आफ्रिका (Pakistan vs Zimbabwe) दौऱ्यावर असून चार टी-20 मॅचची सीरिज अजून 1-1 ने बरोबरीत आहे. दक्षिण आफ्रिकेचे महत्त्वाचे खेळाडू क्विंटन डिकॉक, कागिसो रबाडा, एनरिच नॉर्किया, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी आयपीएल खेळण्यासाठी भारतात आले आहेत, त्यामुळे पाकिस्तान टीमचा पगडा भारी आहे. याआधीच्या वनडे सीरिजमध्ये त्यांचा 2-1ने विजय झाला होता. झिम्बाब्वे दौऱ्यामध्ये पाकिस्तान दोन टेस्ट आणि तीन टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. टी-20 सीरिजची सुरुवात 21 एप्रिलपासून सुरू होणार आहे. 23 आणि 25 एप्रिलला दुसरी आण तिसरी टी-20 खेळवण्यात येणार आहे. यानंतर 29 एप्रिलपासून पहिली टेस्ट आणि दुसरी टेस्ट 7 मेपासून सुरू होईल. या दौऱ्यानंतर खेळाडू पाकिस्तानमध्ये परततील. 1 जूनपासून पाकिस्तान सुपर लीगला (PSL) पुन्हा सुरुवात होईल. कोरोनामुळे पीएसएल अर्ध्यातच पुढे ढकलण्यात आली होती. आता हे सामने 1 ते 20 जूनदरम्यान खेळवण्यात येतील.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Pakistan, Shocking news, Sports, Zimbabwe

    पुढील बातम्या