मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: राहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर! नियमांमध्ये बदलाची केली मागणी

IPL 2021: राहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर! नियमांमध्ये बदलाची केली मागणी

पंजाब किंग्जचा (Punjab Kings) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये  6 विकेट्सनं पराभव झाला. पंजाबचा कॅप्टन केएल राहुल (K.L.Rahul) यानं दिल्ली विरुद्ध झालेल्या पराभवाचं खापर अंपायरच्या निर्णयावर फोडलं आहे.

मुंबई, 19 एप्रिल:  पंजाब किंग्जचा (Punjab Kings)दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये  6 विकेट्सनं पराभव झाला. पंजाबनं दिलेलं 196 रनचं मोठं आव्हान दिल्लीनं 4 विकेट्सच्या मोबदल्यात आरामात पार केलं. पंजाबचा हा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी त्यांना चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) पराभूत केलं होतं. पंजाबचा कॅप्टन केएल राहुल (K.L.Rahul) यानं दिल्ली विरुद्ध झालेल्या पराभवाचं खापर अंपायरच्या निर्णयावर फोडलं आहे.

केएल राहुल आणि मयंक अग्रवाल  यांच्या अर्धशतकांमुळे पंजाबने दिल्लीला ( विजयासाठी 196 रनचं आव्हान दिलं. पंजाबने दिलेलं 196 रनचं आव्हान दिल्लीने सहज पूर्ण केलं. शिखर धवनने (Shikhar Dhawan) 49 बॉलमध्ये 92 रन केले, यामध्ये 13 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. तर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) 17 बॉलमध्ये 32 रन केले. पृथ्वीने 3 फोर आणि 2 सिक्स लगावले. मार्कस स्टॉयनिसने 13 बॉलमध्ये नाबाद 27 रन आणि ललित यादवने 6 बॉलमध्ये नाबाद 12 रन केले. पंजाबकडून झाय रिचर्डसनने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर रिले मेरेडिथ आणि अर्शदीप सिंग यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

या मॅचनंतर बोलताना राहुलनं अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. वानखेडे स्टेडियमवर नेहमीच दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलिंग करणं हे आव्हानात्मक असतं. आम्ही नेहमी या परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं की बॉल बदलणं योग्य ठरलं असतं. मी पराभूत झालेल्या टीमचा कॅप्टन आहे, म्हणून हे सांगत नाही. मी अंपायरकडं काही वेळा बॉल बदलण्याची मागणी केली होती. पण त्यांनी हा नियम नसल्याचं सांगितलं,'' या शब्दात राहुलनं नाराजी व्यक्त केली आहे.

KKR चं चाललंय काय? संधी असूनही रसेलने रन आऊट केलं नाही, VIDEO

"वानखेडेवर ड्यू फॅक्टर निर्णायक ठरला. तसंच शिखर धवनही जबरदस्त खेळला.माझ्या वाढदिवशी जिंकलो असतो तर चांगलं झालं असतं. मी थोडा निराश आहे, पण आमच्या हातामध्ये अजूनही मॅच शिल्लक आहेत," असंही राहुल म्हणाला.

First published:

Tags: Cricket, IPL 2021, Kl rahul, Punjab kings, Shikhar dhavan