मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : KKR चं चाललंय काय? संधी असूनही रसेलने रन आऊट केलं नाही, VIDEO

IPL 2021 : KKR चं चाललंय काय? संधी असूनही रसेलने रन आऊट केलं नाही, VIDEO

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) संघर्ष सुरूच आहे. बँगलोरविरुद्धच्या सामन्यात केकेआरचा (RCB vs KKR) 38 रनने पराभव झाला आहे.

चेन्नई, 18 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) संघर्ष सुरूच आहे. बँगलोरविरुद्धच्या सामन्यात केकेआरचा (RCB vs KKR) 38 रनने पराभव झाला आहे. तर बँगलोरचा यंदाच्या मोसमातला तीन सामन्यांमधला हा तिसरा विजय आहे. या हंगामात फक्त विराटच्याच टीमने सगळे सामने जिंकले आहेत. एबी डिव्हिलियर्स (Ab de Villiers) आणि ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यांच्या आक्रमक अर्धशतकांमुळे आरसीबीने केकेआरला विजयासाठी 205 रनचं आव्हान दिलं, पण त्यांना या आव्हानाच्या जवळही पोहोचता आलं नाही.

मॅक्सवेल आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांच्या 86 रनच्या पार्टनरशीपनंतर मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांनी 53 रनची जलद पार्टनरशीप केली. मॅक्सवेलने 49 बॉलमध्ये 78 रन केले, यात 9 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. तर एबी डिव्हिलियर्सनेही मॅक्सवेल एवढेच फोर आणि सिक्स मारले. एबीने 34 बॉलमध्ये 76 रनची खेळी केली.

एबी डिव्हिलियर्सने आंद्रे रसेलच्या (Andre Russell) 18 व्या ओव्हरमध्ये 17 रन आणि 20 व्या ओव्हरमध्ये 21 रन कुटले, यामुळे बँगलोरचा स्कोअर 200 च्या पार गेला.

या सामन्यात आंद्रे रसेलने सोडलेला रन आऊट चर्चेचा विषय ठरत आहे. इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये एबी डिव्हिलियर्सने मारलेला बॉल सरळ रसेलच्या हातात आला, त्यावेळी काईल जेमिसन (Kyle Jamieson) नॉन स्ट्रायकर एण्डची क्रीज सोडून पळाला होता, पण रसेलने थ्रो करण्याचाही प्रयत्न केला नाही. काईल जेमिसन जवळपास 11 यार्ड पुढे आला असतानाही रसेलने रन आऊटसाठी थ्रो न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket, IPL 2021, KKR, RCB