नवी दिल्ली, 04 मे: देश कोरोना व्हायरसशी (Coronavirus) लढत असताना देशात भरवण्यात येणाऱ्या आयपीएल स्पर्धेवर (IPL 2021) सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. अशावेळी दिवसागणिक आयपीएलमधून समोर येणाऱ्या बातम्या खेळाडू आणि इतरांचं आयुष्य धोक्यात टाकणाऱ्या ठरत आहेत. आताच अशी बातमी समोर येते आहे की, सनरायजर्स हैदराबादच्या दोन महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. सुरुवातीला अशी बातमी समोर आली होती की, SRH चा वृद्धीमान साहा (Wriddhiman Saha ूTested corona positive) कोरोना पॉझिटिव्ह आहे, त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा स्पिनर अमित मिश्रा (Amit Mishra tested positive) देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. यानंतर हैदराबादची टीम देखील आयसोलेशनमध्ये गेली आहे.
SunRisers Hyderabad player Wriddhiman Saha tests positive for COVID-19, SRH's IPL game against Mumbai Indians this evening unlikely
— Press Trust of India (@PTI_News) May 4, 2021
म्हणजेच या स्पर्धेतील एकूण तीन फ्रँचायझीमधील चार खेळाडू आता पॉझिटिव्ह आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचे वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandip Warrior) हे दोन खेळाडू आधी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यानंतर कोलकाता आणि बँगलोर (KKR vs RCB) यांच्यातली सोमवारी होणारी मॅच स्थगित करण्यात आली होती. (हे वाचा- ‘तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत’, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा पंतप्रधानांवर निशाणा ) दरम्यान सोमवारी सीएसकेचे 2 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांची राजस्थान रॉयल्सविरोधातील (Rajasthan Royals) सामना खेळण्याची तयारी नसल्याचं चेन्नई सुपरकिंग्जने बीसीसीआयला (BCCI) कळवल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स असा सामना होणार होता. चेन्नईचे बॉलिंग प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी (Laxmipati Balaji) आणि टीमचे सीईओ एस विश्वनाथन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आयपीएल लेटेस्ट अपडेट बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी अशी माहिती दिली आहे की, यंदाचा आयपीएलचा हंगाम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असून आयपीएलला सुद्धा याचा फटका बसला आहे. एकापाठोपाठ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने बीसीसीआयने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.