दुबई, 29 सप्टेंबर : आयपीएल 2021 (IPL 2021) च्या कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स (KKR vs DC) यांच्यात झालेल्या सामन्यात मोठा वाद झाला. या सामन्यात कोलकात्याचा 3 विकेटने विजय झाला असला, तरी मैदानात आर.अश्विन (R Ashwin) आणि केकेआरचा कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) यांच्यात बाचाबाची पाहायला मिळाली. कोलकात्याचा विकेट कीपर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने मॉर्गन आणि अश्विन यांच्यात मध्यस्ती केली. मॅच संपल्यानंतर कार्तिकने या दोघांमध्ये झालेल्या वादाचं कारण सांगितलं.
IPL 2021: मॉर्गनला आवडली नाही अश्विनची 'ती' गोष्ट, कार्तिकनं सांगितलं वादाचं कारण
दिल्लीची बॅटिंग सुरू असताना राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) फेकलेला थ्रो बॅटिंग करत असलेल्या ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) शरिराला लागला आणि दुसरीकडे गेला. अश्विनने या संधीचा फायदा घेत रन काढण्याचा प्रयत्न केला. माझ्या मते मॉर्गनला हे आवडलं नाही. बॉल चुकून बॅट्समनच्या बॅटला लागला असेल तर खेळ भावनेचा आदर करुन त्यावर रन काढू नये, अशी मॉर्गनची अपेक्षा होती. मी हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला, असं कार्तिक म्हणाला.
Nicepic.twitter.com/CQrOhdv8cG
— Aryan (@Kohlis_shadow) September 28, 2021
मैदानात झालेल्या या वादावर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने त्याच्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. '14 जुलै 2019 ला अखेरच्या ओव्हरमध्ये रन काढत असताना बेन स्टोक्सच्या बॅटला बॉल लागला. यानंतर मॉर्गनने लॉर्ड्सच्या बाहेर धरणं धरलं आणि वर्ल्ड कपची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, ज्यामुळे न्यूझीलंडचा विजय झाला. मोठे आले पसंत न करणारे', असं ट्वीट सेहवागने केलं.
On July 14th , 2019 when it ricocheted of Ben Stokes bat in the final over, Mr Morgan sat on a Dharna outside Lord’s and refused to hold the World cup trophy and New Zealand won. Haina ? Bade aaye, ‘doesn’t appreciate’ waale 😂 pic.twitter.com/bTZuzfIY4S
— Virender Sehwag (@virendersehwag) September 29, 2021
वर्ल्ड कपमधला वाद
सेहवागने आठवण करून दिलेली ही घटना 2019 वर्ल्ड कप फायनलची (World Cup Final 2019) आहे. सामन्याच्या अखेरच्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या फिल्डरने (England vs New Zealand) केलेला थ्रो स्टोक्सच्या (Ben Stokes) बॅटला लागून बाऊंड्री लाईनवर गेला, त्यामुळे इंग्लंडला अधिकचे रन मिळाले. फायनलचा हा सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर झाली. सुपर ओव्हरही टाय झाल्यामुळे सर्वाधिक बाऊंड्री मारलेल्या इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, KKR, R ashwin, Virender sehwag