मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL Auction 2021 : अवघ्या 37 चेंडूत झळकावले शतक, कोणत्या संघात मिळणार 'या' धडाकेबाज खेळाडूला संधी?

IPL Auction 2021 : अवघ्या 37 चेंडूत झळकावले शतक, कोणत्या संघात मिळणार 'या' धडाकेबाज खेळाडूला संधी?

26 वर्षीय अजहरुद्दीनचा प्रवास हा संघर्षमय राहिला आहे. अजहरुद्दीनला 8 भाऊ आहे असून तो सर्वात लहान आहे.

26 वर्षीय अजहरुद्दीनचा प्रवास हा संघर्षमय राहिला आहे. अजहरुद्दीनला 8 भाऊ आहे असून तो सर्वात लहान आहे.

26 वर्षीय अजहरुद्दीनचा प्रवास हा संघर्षमय राहिला आहे. अजहरुद्दीनला 8 भाऊ आहे असून तो सर्वात लहान आहे.

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : आयपीएल 2021 च्या (IPL Auction 2021 ) हंगामाच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. एकापेक्षा एक खेळाडूंचा लिलाव सुरू झाला आहे. 292 खेळाडू पैकी 61 खेळाडूंची निवड होणार आहे. यात सर्वांची नजर असणार आहे ती यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammed Azharuddeen) याच्यावर. कारण, अलीकडे अजहरुद्दीनने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत अवघ्या 37 चेंडूमध्ये शतक झळकावले होते.

मोहम्मद अजहरुद्दीनने 2015 पासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. आतापर्यंत टी 20 च्या करिअरमध्ये 24 सामन्यात त्याने 451 रन्स केले आहे. यात एका शतकाचा समावेश आहे.

IPL Auction 2021 Live : कोण आहे मुंबई इंडियन्सचा नवा खेळाडू अ‍ॅडम मिल्न?

सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये पाचव्या सामन्यात 194 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटवर 214 रन्स केले होते. अजहरुद्दीनने पाच सामन्यात तब्बल 15 सिक्स लगावले. अजहरुद्दीनवर दोन वर्षांपूर्वी आयपीएलच्या लिलावामध्ये 20 लाखांची बोली लावण्यात आली आहे. पण,  कोणत्याही संघाने खरेदी केली नाही.

26 वर्षीय अजहरुद्दीनचा प्रवास हा संघर्षमय राहिला आहे. अजहरुद्दीनला 8 भाऊ आहे असून तो सर्वात लहान आहे. क्रिकेटबद्दल लहानपणापासून अजहरुद्दीनला आवड होती. त्यामुळे त्याने क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी मार्ग निवडला.

सावध राहा! सोशल होणं येऊ शकतं अंगाशी; येतोय ‘इमेल फिमेल’

अजहरुद्दीन हा जेव्हा प्राथमिक स्तरावर क्रिकेट खेळत होता. तेव्हा त्याच्या आई आणि वडिलांचे निधन झाले. या कठीण काळातही त्याच्या भावांनी त्याची साथ दिली आणि क्रिकेट खेळत राहण्यास प्रोत्साहन दिली. अजहरुद्दीनचा मोठा भाऊ कमरुद्दीन हे माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीनचे मोठे चाहते होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या लहान भावाचे नाव हे अजहरुद्दीन ठेवले.

अजहरुद्दीन हा माजी क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीप्रमाणे करिअर करू पाहत आहे. आधी तो फुटबॉल खेळत होता. नंतर शाळेत त्याला धोनीप्रमाणेच विकेटकिपरिंगची संधी मिळाली. त्यातून त्याने आपण चांगले फलंदाज असल्याची मोहरही उमटवली. आयपीएलमध्ये खेळण्यास संधी मिळाली तर पुढे भारतीय संघासाठी खेळण्याची इच्छा सुद्धा अजहरुद्दीनने बोलून दाखवली.

First published:
top videos

    Tags: IPL 2021, Ipl 2021 auction