स्पोर्ट्स

  • associate partner

IPL लिलावात लागली कोट्यवधींची बोली, आता एका फटक्यात 'हे' खेळाडू होणार कंगाल

IPL लिलावात लागली कोट्यवधींची बोली, आता एका फटक्यात 'हे' खेळाडू होणार कंगाल

कोरोनामुळे आयपीएल लिलावात कोट्यवधींना विकत घेतलेल्या खेळाडूंचे मोठे नुकसान होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 18 मार्च : भारतातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगला म्हणजे आयपीएलला (IPL 2020) कोरोनाचा फटका बसला आहे. जगभरात थैमान घालत असलेल्या या विषाणूमुळे आयपीएलचा तेरावा हंगाम पुढे ढकलण्यात आला. त्यामुळं 29 मार्चपासून सुरू होणारी ही स्पर्धा आता 15 एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र कोरोनामुळे परिस्थिती चिघळल्यास आयपीएल रद्दही होऊ शकते. त्यामुळं बीसीसीआय, आयपीएलचे 8 संघ आणि सर्व खेळाडूंना हजारो कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयपीएल लिलावात कोट्यवधींना विकत घेतलेल्या खेळाडूंचे मोठे नुकसान होणार आहे.

आयपीएलच्या या हंगामासाठी डिसेंबरमध्ये खेळाडूंचा लिलाव करण्यात आला होता. या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना जास्त मागणी होती. या लिलावात जलद गोलंदाज पॅट कमिन्सला 15.5 कोटींना, ग्लेन मॅक्सवेलला 10.75 तर नॅथन कुल्टर नाईलला 8 कोटींना विकत घेतले होते. मात्र आता कोरोनामुळे सर्व देशांनी व्हिसा सेवा आणि प्रवासावर बंदी घातली आहे. त्यामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम 15 एप्रिलपासून सुरू झाला तरी विदेशी खेळाडूंना या स्पर्धेत सामिल होता येणार नाही. कोरोनामुळे एका फटक्यात या खेळाडूंना कोट्यवधींचा फटका बसू शकतो.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी केविन रॉबर्ट्स यांनी, आयपीएल 2020मध्ये भाग घेण्याचा निर्णय खेळाडूंचा असेल, आम्ही यात हस्तगत करणार नाही. मात्र तर सरकारने प्रवासाची परवानगी न दिल्यास याला आम्ही जबाबदार असणार आहे, असे मत व्यक्त केले होते.

आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा दबदबा

आयपीएलमध्ये कायमच ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा दबदबा राहिला आहे. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ असो किंवा ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स असो, यांना पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. मात्र कोरोनामुळे या खेळाडूंना भारतात पाहणे कठिण होणार आहे.

आयपीएल रद्द होणार?

कोरोनाचा परिणाम भारताच्या सर्वात मोठ्या क्रिकेट लीगवरही झाला आहे. बीसीसीआयने आयपीएलचा तेराव हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं 29 मार्चपासून सुरू होणारा हंगाम आता 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. कोरोनामुळे सर्व संघांनी आपले सरावही रद्द केले आहेत.

बीसीसीआयला होणार 10 हजार कोटींचे नुकसान

आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला सगळ्यात मोठा दणका बसणार आहे. जर या आकडेवारीवर विश्वास ठेवल्यास आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला 10 हजार कोटी रुपयांचा मोठा तोटा होऊ शकेल. क्रिकट्रॅकरने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल रद्द झाल्यामुळे बीसीसीआयचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. ही रक्कम दहा हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. इतकेच नव्हे तर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे प्रायोजकत्व, माध्यम हक्क, फ्रेंचायझी महसूल यांनाही कोट्यावधींचा तोटा होऊ शकतो.

First published: March 18, 2020, 7:33 AM IST

ताज्या बातम्या