स्पोर्ट्स

  • associate partner

IPL मध्ये आता आणखी एक ट्वीस्ट, एप्रिलमध्ये नाही तर...

IPL मध्ये आता आणखी एक ट्वीस्ट, एप्रिलमध्ये नाही तर...

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमियर लिग 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 मार्च : कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमियर लिग 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. पण सध्या देशातली परिस्थिती पाहता इतक्यात आयपीएल खेळवणं शक्य नाही. बीसीसीआय मात्र स्पर्धेचं आयोजन करायचं यावर ठाम दिसत आहे. तसंच सामन्यांची संख्या कमी करण्यास बीसीसीआय तयार नसल्याचं दिसत आहे. त्यामुळं आता आय़पीएल बाबत काय निर्णय होणार याकडे लक्ष लागलं आहे. दरम्यान, आयपीएल जुलै ते सप्टेंबर या कालावधीत आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. याचवेळी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा असणार आहेत.

जगभर कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. भारतात जवळपास 150 लोकांना कोरोना झाला आहे. अशा परिस्थितीत इंडियन प्रीमियर लीगचे आयोजन कठिण आहे. त्यामुळे बीसीसीआय नव्या पर्यायाचा शोध घेत आहे. तसेच सध्याच्या फॉरमॅटनुसार 60 सामने खेळवण्याबाबत बीसीसीआय आग्रही असल्यानं सामने इतर देशात किंवा पुढे ढकलण्याचा विचार केला जात आहे.

दरम्यान, जगभरातील क्रीडा स्पर्धांना कोरोनाचा फटका बसला आहे.  सध्या सामने भरवण्यासारखी परिस्थिती नाही.  तसंच बीसीसीआय आयपीएल रद्द करण्याच्या बाजूने नाही. 2020 च्या एफटीपीनुसार युएईमध्ये आशिया कप आणि सप्टेंबर महिन्यात इंग्लंड-पाकिस्तान मालिका होणार आहे. याशिवाय जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कोणतीही मोठी स्पर्धा, मालिका नाही. तसंच भारत-लंका यांच्यातील मालिका जुन-जुलै महिन्यात होणार आहे. त्यामध्ये बीसीसीआय बदल करू शकते. जुलै महिन्यात आयपीएलचे आय़ोजन केल्यास ऑलिम्पिक स्पर्धेसोबतच आयपीएलचा रणसंग्राम सुरू होईल.

हे वाचा : मुंबईच्या लेकीची अभिमानास्पद कामगिरी! स्कोरर, पंच ते आता थेट ICC पॅनेलवर निवड

आयपीएल जुलैपर्यंत पुढे ढकलल्यास सामने देशाबाहेर आयोजित केले जाऊ शकतात. 2009 मध्ये आयपीएळ दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आलं होतं. तेव्हा 37 दिवसांत स्पर्धा संपली होती. ही स्पर्धा 5 आठवड्यापर्यंत चालायची. जर एवढा वेळ मिळाला तर आयपीएलचे आयोजन भारतात अर्धे सामने आणि उरलेले भारताबाहेर असं होऊ शकतं.

हे वाचा : धोनीचं कमबॅक होणार की नाही? टीम इंडियाबद्दल सेहवागचं मोठं वक्तव्य

First published: March 18, 2020, 5:02 PM IST
Tags: IPL 2020

ताज्या बातम्या