मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /रोहित शर्मा नाही तर 'हा' खेळाडू IPL मध्ये मारू शकतो डबल सेंच्यूरी, दिग्गज क्रिकेटपटूचा दावा

रोहित शर्मा नाही तर 'हा' खेळाडू IPL मध्ये मारू शकतो डबल सेंच्यूरी, दिग्गज क्रिकेटपटूचा दावा

आयपीएल संघातील एका कोचनं स्पर्धा सुरू होण्याआधीच कोणता खेळाडू दुहेरी शतक करू शकतो हे सांगितले आहे.

आयपीएल संघातील एका कोचनं स्पर्धा सुरू होण्याआधीच कोणता खेळाडू दुहेरी शतक करू शकतो हे सांगितले आहे.

आयपीएल संघातील एका कोचनं स्पर्धा सुरू होण्याआधीच कोणता खेळाडू दुहेरी शतक करू शकतो हे सांगितले आहे.

नवी दिल्ली, 07 सप्टेंबर : आयपीएल 2020 (IPL 2020) तेराव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानंतर सर्व संघ जोरदार तयारीला लागले आहेत. त्याचबरोबर आपल्या संघासाठी उत्तम रणनीती तयार करण्याचे काम संघ प्रशिक्षक करत आहेत. यातच आता आयपीएल संघातील एका कोचनं स्पर्धा सुरू होण्याआधीच आयपीएलमध्ये कोणता खेळाडू दुहेरी शतक करू शकतो हे सांगितले आहे.

दोन वेळा आयपीएल चॅम्पियन कोलकाता नाइट रायडर्स संघाचे मेंटोर डेव्हिड हसी (David Hussey) ने असा दावा केला आहे की, कॅरेबियन अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल टी-20 क्रिकेटमध्ये दुहेरी शतक मारू शकतो. हसीनं हे वक्तव्य संघाच्या नव्या रणनीतीबाबत केले. यंदाच्या हंगामात केकेआरचा संघ रसेलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरवण्याच्या विचारात आहे.

वाचा-CSKनंतर आता 'या' संघाला कोरोनाचा धोका, मुख्य सदस्य निघाला पॉझिटिव्ह

टी-20मध्ये रसेल करू शकतो दुहेरी शतकी खेळी

कोलकाता नाइड राइडर्सचा (KKR) कोच डेव्हिड हसीनं , "आमचा संघ वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करत आहे. यात आंद्रे रसेलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्याच्या विचारात आम्ही आहोत. यामुळे संघाला फायदा होईल, त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर रसेल आल्यास त्याला 60 चेंडूचा सामना करण्याची संधी मिळेल. असे झाल्यास रसेल आरामात टी-20 इतिहासातील पहिले दुहेरी शतकही मारू शकतो". KKR आपला पहिला सामना 23 सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे.

वाचा-मोठी बातमी! क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली; IPL 2020 चं वेळापत्रक जारी

रसेलचा आयपीएल रेकॉर्ड

रसेलचे नाव आयपीएलमधील धोकादायक खेळाडूंमध्ये घेतले जाते. केवळ फलंदाजी नाही तर गोलंदाजीमध्येही रसेल जबरदस्त कामगिरी करतो. आयपीएलच्या गेल्या हंगामात केवळ 14 सामन्यात त्यानं 510 धावा केल्या होत्या तर 11 विकेट घेतल्या होत्या. रसेलनं आयपीएलमध्ये 64 सामन्यात 33.33च्या सरासरीनं फलंदाजी केली आहे. यात 1400 धावा केल्या आहेत. यात 8 अर्धशतकांचा समावेश आहे. तर त्याची सर्वोत्तम खेळी 88 आहे. आयपीएलच्या इतिहासात रसेल सर्वात जास्त स्ट्राइक रेट असलेला फलंदाज आहे. रसेल 186.41च्या स्ट्राइक रेटनं फलंदाजी करतो.

First published:
top videos

    Tags: Rohit sharma