चेन्नई सुपरकिंग्ज संघानंतर आता दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitlas) संघावर कोरोनाचे सावट आहे. एकीकडे आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्यानंतर दिल्ली संघाच्या सहाय्यक फीजिओथेरेपिस्ट कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. सध्या त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
दिल्ली कॅपिटल्सने याबाबत रविवारी माहिती दिली. त्यांनी सपोर्ट स्टाफमधील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. फ्रेचायझीनं केलेल्या पहिल्या दोन चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर तिसरी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
दिलासादायक बाब म्हणजे फ्रेचायझीनं दिलेल्या माहितीनुसार, हे सहाय्यक फीजिओ कोणत्याही खेळाडूला भेटले नव्हते किंवा संपर्कात आले नव्हते. त्यामुळे खेळाडूंना कोणत्याही धोका नाही आहे.
बीसीसीआयनं याबाबत माहिती दिली होती की युएइ आल्यानंतर संघाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ अशा एकूण 1988 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यानंतर चेन्नई संघाच्या दोन खेळाडूंसह 11 सपोर्ट स्टाफ पॉझिटिव्ह आढळले होते.
दुसरीकजे बीसीसीआयने आयपीएल 2020 चं वेळापत्रक जारी केलं आहे. यंदा UAE मध्ये आयपीएलचे सामने होणार आहे. या सीजनची सुरुवात 19 सप्टेंबरपासून अबू धाबी येथे सुरू होणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये रंगणार आहे.