नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. याआधी चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाचे 2 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. यात जलद गोलंदाज दीपक चाहरचाही (Deepak Chahar) समावेश होता. आता चाहरचा दुसरा कोरोना रिपोर्ट समोर आला आले. आनंदाची बाब म्हणजे दीपकचा दुसरा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दीपक आता इतर खेळाडूंसोबत हॉटेलमध्ये पोहचला आहे. आयपीएलसाठी दुबईत पोहचल्यानंतर दीपक चाहर आणि ऋतुराज गायकवाड यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. याचबरोबर स्टाफमधील 11 जणांचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले होते. CSK चे सीइओ केएस विश्वनाथन यांनी सांगितले की, “दीपक चाहरचे दोन कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले असून तो आता टीम बबलमध्ये परतला आहे.”. वाचा- मुंबईच्या टीम रूमची Virtual Tour, पाहून म्हणाल…‘करा मला क्वारंटाइन’
वाचा- ‘हे’ 4 खेळाडू घेऊ शकतात सुरेश रैनाची जागा, धोनीशी आहेत चांगले संबंध मात्र बीसीसीआयच्या प्रोटोकॉलनुसार कार्डियो टेस्ट केली जाणार आहे. त्यानंतर आणखी एक कोरोना चाचणी केली जाईल. सध्या चाहरला 14 दिवस दुसऱ्या हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. वाचा- कोरोनाला घाबरले दिग्गज खेळाडू? आतापर्यंत ‘या’ 5 खेळाडूंनी घेतली IPLमधून माघार चेन्नई संघातील इतर खेळाडू सध्या सराव करत आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामात धोनीच्या नेतृत्त्वाखाली हा संघ 19 सप्टेंबररोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहेत.

)







