• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • भारताचा स्टार कॉमेंटेटर खेळणार IPL! धोनीला पुन्हा चॅम्पियन करून घेणार क्रिकेटमधून निवृत्ती

भारताचा स्टार कॉमेंटेटर खेळणार IPL! धोनीला पुन्हा चॅम्पियन करून घेणार क्रिकेटमधून निवृत्ती

रतीय संघात गेल्या अनेक वर्षांपासून संधी न मिळालेला दिग्गज गोलंदाज आता निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी : भारताचे अनेक क्रिकेटपटू सध्या निवृत्ती घेण्याच्या मार्गावर आहे. मात्र काही खेळाडू भारतीय क्रिकेट संघात जागा न मिळाल्यामुळं फक्त फक्त आयपीएल खेळण्यास उत्सुक असतात, तर काही निवृत्तीनंतर समालोचक (कॉमेंटेटर) म्हणून चाहत्यांचे मनोरंजन करतात. मात्र भारतीय संघात गेल्या अनेक वर्षांपासून संधी न मिळालेला दिग्गज गोलंदाज आता निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे. भारतीय संघातून बर्‍याच दिवसांपासून दूर असलेला ऑफस्पिनर हरभजन सिंग क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त घेणार आहे. मात्र इंडियन प्रीमियर लीगनंतर (IPL) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होऊ शकतात. गेल्या वर्षी युवराज सिंग आणि इरफान पठाण यांनीही संघातून बाहेर पडल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देण्याचे ठरवले. वाचा-अखेर झाली धोनीच्या कमबॅकची घोषणा, CSKने शेअर केला खास VIDEO स्टार भारतीय खेळाडू हरभजनच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी हंगामात हरभजन चेन्नई सुपर किंग्जचेही प्रतिनिधित्व करेल. यावर्षी मार्च आणि एप्रिलमध्ये होणाऱ्या आयपीएल दरम्यान तो आपल्या कारकीर्दीविषयी अधिकृत घोषणा करेल. भज्जी अखेर मार्च 2016मध्ये भारताकडून खेळला होता. वाचा-IPLआधी मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा झटका, दिग्गज प्रशिक्षकाने सोडली साथ 39 वर्षीय हरभजनने 2016 आशिया कपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. 2015 मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या चार एकदिवसीय सामन्यात तो भारतीय एकदिवसीय संघात परतला, तर 2015मध्ये तीन वर्षानंतर तो टी-20 संघात परतला. हरभजनने मार्च 1998 मध्ये कसोटी सामन्यात पदार्पण केले. त्याने 103 कसोटी सामन्यांमध्ये ऑगस्ट 2015 पर्यंत 417 बळी घेतले आहेत. वाचा-RCB च्या लोगोवरून विराट आधी भडकला आता म्हणतो, 'लोगो' का काम होता है कहना आयपीएलमध्ये भज्जी 2008 ते 2017मध्ये मुंबई इंडियन्स संघात होता. त्यानंतर, 2018पासून भज्जी चेन्नई सुपर किंग्ज संघात आहे. त्याने 48 सामन्यांमध्ये पंजाब रणजी संघाचे प्रतिनिधित्व केले. तो पंजाबचा कर्णधारही होता. सध्या भज्जी समालोचक म्हणून काम करत असून, धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला येत्या आयपीएल हंगामात चॅम्पियन करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो.
  Published by:Priyanka Gawde
  First published: