मुंबई, 15 फेब्रुवारी : टिकटॉकवर कोणता व्हिडिओ ट्रेंड होईल सांगता येत नाही. अचानक एखाद्या व्हिडिओला प्रसिद्धी मिळते. आताही असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. क्रिकेटमध्ये एखाद्या फलंदाजाला बाद केल्यानंतर गोलंदाज वेगवेगळ्या प्रकारे आनंद साजरा करतात. आयपीएल, वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक गोलंदाजाची अशी स्टाइल फेमस आहे. आफ्रिकेचा इम्रान ताहिर, विंडिजचा शेल्डन कॉट्रेल, ब्राव्हो यांच्या स्टाइलने धमाल केली होती. आता एका खेळाडूच्या जगावेगळ्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ तुफान गाजतो आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला गर्मी साँग जोडण्यात आलं आहे. या कारणामुळे व्हिडिओ लोकप्रिय होत आहे. 29 जानेवारीला प्रोव्हिनशियल कपमध्ये नॉर्थर्नस विरुद्ध बॉर्डर यांच्यात सामना झाला होता. यामध्ये नॉर्थर्नचा गोलंदाज रिवाल्डो नूनसामीने प्रतिस्पर्धी फलंदाजाच्या पायचितचे अपील केलं त्यानंतर पंचांनी फलंदाजाला बाद ठरवताच मूनसामी जमीनीवर झोपून वेगळ्या पद्धतीनं जल्लोष करायला लागला.
@jr.shreyasbaikar_ hayy garmi 💯 #cricket #lol ♬ original sound - jr.shreyasbaikar_060
मूनसामीच्या आगळ्या वेगळ्या सेलिब्रेशनमुळे मैदानावर खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरले नाही. रिवाल्डो मूनसामी पार्ट टाइम गोलंदाज आहे. ज्यावेळी तो गोलंदाजी करत होता तेव्हा त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपण इतक्या सहज विकेट मिळवू. VIDEO : बोल्टपेक्षा वेगाने धावला भारतीय तरुण? 100 मीटर अंतर कापलं 9.55 सेकंदात बॉर्डरच्या फलंदाजाला बाद केल्यानंतर मूनसामीला इतका आनंद झाला की त्याला काय करावं कळेना. त्यानंतर जमीनीवर झोपून त्यानं सेलिब्रेशन केलं. टिकटॉकवर त्याच्या या सेलिब्रेशनचा अनोखा अंदाज शेअर केला जात आहे. अंजली नाही तर दुसरं कुणीतरी आहे मास्टर ब्लास्टरचं ‘पहिलं प्रेम’, शेअर केला VIDEO

)







