• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL MI vs SRH : 70 मिनिटं नाही 240 चेंडू, आता शाहरुखच्या KKRचं नशीब मुंबई इंडियन्सच्या हाती

IPL MI vs SRH : 70 मिनिटं नाही 240 चेंडू, आता शाहरुखच्या KKRचं नशीब मुंबई इंडियन्सच्या हाती

IPL MI vs SRH : मुंबई इंडियन्सचा विजय KKRसाठी फायद्याचा, सामना न खेळताच असे गाठणार Playoff.

 • Share this:
  शारजा, 03 नोव्हेंबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामात (IPL 2020) 55 सामन्यानंतर प्लेऑफसाठी तीन संघ निश्चित झाले आहेत. आज लीग स्टेजमधला अखेरचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (SRH vs MI) यांच्यात होणार आहे. या सामन्यानंतर प्लेऑफ गाठणारा चौथा संघ कोणता असेल हे स्पष्ट होईल. सध्या प्लेऑफच्या शर्यतीत KKR आणि SRH हे दोन संघत आहे. KKRला प्लेऑफ गाठण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी प्रार्थना करावी लागेल. सोमवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीनं 6 विकेटनं सामना जिंकत प्लेऑफमध्ये जागा मिळवली. नेट रन रेटमुळे बॅंगलोरही सामना गमावून प्लेऑफसाठी पात्र ठरला. तर, सध्या टॉपवर मुंबईचा संघ आहे. मुंबईने 13 सामन्यात 18 गुण मिळवले आहेत. मुंबई पहिला क्वालिफायर सामना दिल्लीविरुद्ध खेळणार आहे. वाचा-कोहलीनं ज्या खेळाडूला 2019मध्ये बेंचवर बसवलं, तोच ठरला RCBचा किंगमेकर वाचा-IPL 2020 : चेन्नईचा ऑल राउंडर घेणार क्रिकेट संन्यास; लवकरच करणार घोषणा KKR की हैदराबाद? आज आयपीएलमध्ये अखेरचा लीग सामना होणार आहे. या सामन्यात हैदराबादची टक्कर अव्वल मुंबईविरुद्ध होईल. मुंबईचा पराभव झाला तर त्याचा फटका त्यांना नाहीतर KKRला बसेल. तर हैदराबादसाठी हा करो वा मरो सामना असेल. हैदराबादनं हा सामना गमावल्यास त्यांचा आयपीएलमधला प्रवास संपले आणि KKR प्ले ऑफसाठी क्वालिफाय होईल. वाचा-बॅटिंग नाही तर जाडेपणाची स्पर्धा! युवराजनं उडवली रोहित-पंतची खिल्ली नेट रनरेटमध्ये अडकले सर्व संघ सध्या हैदराबादचा रनरेट KKR पेक्षा जास्त चांगला आहे. हैदराबादचा रन रेट 0.555 आहे. तर KKRचा -0.214. कोलकाताकडे 14 गुण आहेत. त्यामुळे हैदराबादनं सामना जिंकला तर रेन रेटच्या जोरावर क्वालिफाय होऊन तिसऱ्या क्रमांकावर पोहचतली. मात्र सामना गमावला तर आयपीएल बाहेर व्हावे लागेल.
  Published by:Priyanka Gawde
  First published: