दुबई, 2 नोव्हेंबर : चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) संघातला महत्त्वाचा खेळाडू आणि ऑलराउंडर शेन वॉटसन मायदेशी गेल्यानंतर निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता आहे. चेन्नई संघातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही आयपीएल संपवून ऑस्ट्रेलियाला परतल्यानंतर लगेच वॉटसन क्रिकेटमधून संन्यास घेणार आहे. 2013 च्या IPL मध्ये तो दिसणार नाही. शेन वॉटसन ऑस्ट्रेलियन संघातून याआधीच निवृत्त झाला आहे. तो आयपीएल आणि T20 सामने खेळत होता. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू म्हणून नावाजलेल्या या क्रिकेटपटूने सर्व प्रकारच्या आणि स्तरावरच्या क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायची तयारी केली आहे. 29 ऑक्टोबरला शेन वॉटसन कोलकाता नाइट रायडर्सविरोधात अखेरची मॅच खेळला.
IPL 13: Watson to announce retirement after reaching Australia, says CSK official
— ANI Digital (@ani_digital) November 2, 2020
Read @ANI Story | https://t.co/MDnjoSEWK9 pic.twitter.com/U8vJSbE9Up
याचा अर्थ पुढच्या वर्षीच्या IPL मध्ये शेन वॉटसन दिसणार नाही. CSK च्या संघ व्यवस्थापनाने ANI ला दिलेल्या माहितीनुसार, शेन वॉटसनने टीमला निवृत्तीची कल्पना दिली आहे. पण तशी अधिकृत घोषणा तो ऑस्ट्रेलियात परतल्यानंतर करेल. आपल्या कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतरच शेन वॉटसन निवृत्तीबाबतची अधिकृत माहिती आणि घोषणा करण्याची शक्यता आहे. चेन्नई सुपरकिंग्जच्या संघातले अनेक खेळाडू वयाने मोठे आहेत. त्यामुळे पुढच्या हंगामात यातले किती खेळाडू मैदानात दिसतील याची नेहमी चर्चा होते. स्वतः कॅप्टन धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर तो IPL खेळेल का असं वाटत होतं. पण IPL खेळत राहणार असल्याचं माहीने स्पष्ट केलं आहे.