धर्मशाला, 11 मार्च : न्यूझीलंड दौऱ्यात सपाटून मार खाल्लेल्या टीम इंडियाची गुरुवारी दक्षिण आफ्रिकेशी गाठ पडणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका गुरुवारपासून सुरु होणार आहे. याआधी न्यूझीलंडने भारताला क्लीन स्वीप केलं होतं. तर दक्षिण आफ्रिकेनं याआधीच्या मालिकेत 3-0 ने विजय मिळवला आहे. दरम्यान भारतीय संघात हार्दिक पांड्यासह भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन यांनी पुनरागमन केलं आहे.
कोरोना व्हायरसचा धोका असताना त्यातच सामन्यावर पावसाचे सावट आहे. या मालिकेत पांड्या संघात आल्यानं विराटला आणखी चांगला पर्याय मिळाला आहे. विराट कोहली सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. तर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर न्यूझीलंड दौऱ्यात चांगल्या फॉर्ममध्ये होते. केएल राहुलकडे पुन्हा एकदा यष्टीरक्षणाची जबाबादारी सोपवली जाऊ शकते. त्यामुळे ऋषभ पंतला संघाबाहेर रहावं लागण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा दुखापतीने बाहेर असल्यानं पुन्हा एकदा पृथ्वी शॉ किंवा शुभमन गिल यांच्यापैकी एकाला संधी मिळेल.
भुवनेश्वर कुमार संघात आल्यानं गोलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. न्यूझीलंडविरुद्ध दुखापत झाल्यानं शमीला विश्रांती देण्यात आली आहे. तर धर्मशालाच्या वेगवान खेळपट्टीवर संघात रविंद्र जडेजा एकमेव फिरकीपटू असेल. याशिवाय कुलदीप यादवला संघात घेतलं जाण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकल्यानं आफ्रिकेच्या संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. तर काही खेळाडू दुखापतींचा सामना करत असल्यानं ही मालिका त्यांच्यासाठी आव्हानात्मक असेल. दरम्यान, धर्मशालावर आफ्रिका पहिल्यांदाच खेळणार आहे. तर भारताने या मैदानावर चारपैकी दोन सामने जिंकले आहेत.
हे वाचा : कोरोनामुळे टीम इंडियाची होणार धुलाई? गोलंदाजांच्या एका निर्णयाचा होणार परिणाम
भारतीय संघ : शिखर धवन, पृथ्वी शॉ, विराट कोहली, केएल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, शुभमन गिल.
VIDEO : पुजारा बाद होता पण नियमाने वाचवलं, पंच आणि खेळाडूंमध्ये झाला वाद मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.