मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2020: 2 चेंडूंमध्ये हॅट्रिक घेण्याची जादू करणाऱ्या खेळाडूवर BCCIने घातली बंदी, शाहरूख खानला मोठा धक्का

IPL 2020: 2 चेंडूंमध्ये हॅट्रिक घेण्याची जादू करणाऱ्या खेळाडूवर BCCIने घातली बंदी, शाहरूख खानला मोठा धक्का

शाहरूख खान याच्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR)ने प्रवीण तांबे याला 20 लाखांची बोली लावत खरेदी केलं होतं.

शाहरूख खान याच्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR)ने प्रवीण तांबे याला 20 लाखांची बोली लावत खरेदी केलं होतं.

शाहरूख खान याच्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR)ने प्रवीण तांबे याला 20 लाखांची बोली लावत खरेदी केलं होतं.

मुंबई, 27 फेब्रुवारी : आयपीएलमध्ये सर्वाधिक वय असणारा क्रिकेटपटू प्रवीण तांबे याला बीसीसीआयने दणका दिला आहे. त्यामुळे 48 वर्षीय प्रवीण तांबे आता आयपीएलमध्ये (IPL) खेळू शकणार नाही. शाहरूख खान याच्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR)ने प्रवीण तांबे याला 20 लाखांची बोली लावत खरेदी केलं होतं. मात्र आता बीसीसीआयने तांबेवर आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातली आहे.

प्रवीण तांबे याने शारजाह इथं झालेल्या टी-10 लीगमध्ये सहभाग घेतला होता. यामुळेच त्याच्यावर बीसीसीआयने बंदीचं अस्त्र उगारलं आहे. प्रवीण तांबे याने 2018 मध्ये क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तसंच याबाबत मुंबई क्रिकेट संघाला (MCA) माहितीही दिली होती. त्यावेळी हेड कॉक कमेटीकडून MCA चालवण्यात येत होती.

निवृत्तीच्या घोषणेनंतर प्रवीण तांबे शारजाह इथं टी-10 लीग खेळण्यासाठी गेला. या टुर्नामेंटनंतर त्याने पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आणि मुंबई लीगमध्ये सहभाग घेतला. बीसीसीआयच्या नियमांनुसार कोणताही भारतीय खेळाडूने सक्रिय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याशिवाय दुसऱ्या देशाच्या क्रिकेट बोर्डाने आयोजित केलेल्या टी20 किंवा टी10 लीगमध्ये सहभागी होऊ शकत नाही.

IPLआधी सनरायझर्स हैदराबाद संघात मोठा बदल! बॅननंतर 'या' खेळाडूला केलं कॅप्टन

दरम्यान, 'प्रवीण तांबेविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईची माहिती केकेआरला देण्यात आली आहे. तांबेला आता आयपीएल खेळता येणरा नाही. जर त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी देण्याचा विचार झाला तर सर्वांनाच संमती द्यावी लागेल,' असं आईपीएल अध्यक्ष बृजेश पटेल यांनी म्हटल्याचं वृत्त 'इंडियन एक्सप्रेस' या दैनिकाने दिलं आहे.

प्रवीण तांबेचा चमत्कार

2014 मध्ये प्रवीण तांबेने आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. तांबेने अवघ्या दोन चेंडूंमध्ये हॅट्रिक घेण्याची किमया केली होती. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या या सामन्यातील 16 व्या ओव्हरमध्ये तांबेने पहिला चेंडू वाइड फेकला. मात्र तो चेंडू टोलवण्यासाठी पुढे आलेला मनोज तिवारी यष्टीचीत झाला. त्यानंतर पुढील दोन चेंडूंवर तांबेने यूसुफ पठाण आणि रयान टेन याला बाद करत हॅट्रिक साजरी केली.

First published:

Tags: IPL 2020, Kolkata knight riders