हैदराबाद, 27 फेब्रुवारी : इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2020) तेराव्या हंगामाची सुरुवात 29 मार्चपासून होणार आहे. या हंगामाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. मात्र याआधी सनरायझर्स हैदराबाद संघात एक मोठा बदल झाला आहे. या संघानं तेराव्या हंगामाआधी आपला कर्णधार बदलला आहे. याआधी न्यूझीलंडच्या केन विल्यम्सनकडे SRH संघाचे कर्णधारपद होता. मात्र आता ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर कर्णधार होणार आहे. डेव्हिड वॉर्नरला पुन्हा एकदा कर्णधार म्हणून नेमले आहे, याआधी त्याला 2018 च्या आयपीएलमध्ये खेळू दिले नाही.
सनरायझर्स हैदराबाद (SRH) फ्रँचायझीने डेव्हिड वॉर्नरला आयपीएल 2020 साठी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. आयपीएल 2018 मध्ये डेव्हिड वॉर्नरवर सनरायझर्स हैदराबादने बंदी घातली होती, कारण त्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉल टॅम्परिंगमुळे एका वर्षावर बंदी घातली होती. आयपीएल 2019 मध्ये हैदराबादकडून वॉर्नरनं सर्वात जास्त धावा केल्या होत्या.
🚨Announcement🚨#OrangeArmy, our captain for #IPL2020 is @davidwarner31. pic.twitter.com/lV9XAMw6RS
— SunRisers Hyderabad (@SunRisers) February 27, 2020
2016मध्ये हैदराबादला जिंकून दिले होते IPL
याआधी डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने विजेतेपद पटकावले होते. 2016 मध्ये संघाचे नेतृत्व करताना डेव्हिड वॉर्नरने सनरायझर्स हैदराबाद चॅम्पियन बनविले होते, तर 2018मध्ये SRHचा संघ टीम अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जकडून पराभूत झाली होती. 2013मध्ये सनरायझर्सच्या संघाने आयपीएल खेळण्यास सुरुवात केली. त्यावेळी कुमार संगकारा कर्णधार होता.
वॉर्नरला सोडावे लागले होते कर्णधारपद
वॉर्नरला चेंडूत केलेल्या छेडछाडीप्रकरी दोषी ठरवल्यानंतर सनरायझर्स संघाचा कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यानंतर, केन विल्यमसन यांनी 2018 आणि 2019 च्या हंगामात संघाचे नेतृत्व केले. वॉर्नरने गेल्या वर्षी आयपीएलमध्ये कमबॅक केले. मात्र त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा देण्यात आली नाही. आयपीएल 2019मध्ये संघाने प्ले ऑफपर्यंत मजल मारी. मात्र गतविजेत्या मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाल्यानंतर चौथ्या स्थानापर्यंतचा त्यांचा प्रवास संपुष्टात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.