स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020 आधीच UAE मध्ये डिव्हिलियर्स हैराण, म्हणाला-चेन्नईची आठवण येतेय

IPL 2020 आधीच UAE मध्ये डिव्हिलियर्स हैराण, म्हणाला-चेन्नईची आठवण येतेय

IPL 2020: कमी प्रेक्षक त्याचप्रमाणे याठिकाणी असणारी उष्णता या यावर्षीच्या आयपीएलमधील मोठ्या समस्या असतील, अशी प्रतिक्रिया रॉयल चँलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Banglore) तडाखेबाज फलंदाज ए. बी.डिव्हिलियर्सने (AB de Villiers) दिली आहे.

  • Share this:

दुबई, 17 सप्टेंबर : जगभरात कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गामुळे यंदाचे आयपीएल हे यूएई (UAE IPL 2020) आयोजित करण्यात आले आहे. कमी प्रेक्षक त्याचप्रमाणे याठिकाणी असणारी उष्णता या यावर्षीच्या आयपीएलमधील मोठ्या समस्या असतील, अशी प्रतिक्रिया रॉयल चँलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Banglore) तडाखेबाज फलंदाज ए. बी.डिव्हिलियर्सने (AB de Villiers) दिली आहे.

कोरोनाचा  सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. अशातच यंदाचा इंडियन प्रिमियर लीगचा हंगाम रद्द करण्याचे देखील चित्र होते. त्यामुळे ज्या भागात कोरोनाचा संसर्ग कमी अशा ठिकाणी आयपीएल खेळविण्यात येणार आहे.  संयुक्त अरब अमिरात अर्थात यूएई या देशांमधील मैदानावर आयपीएलचा हा हंगाम रंगणार आहे. मात्र याठिकाणची एक समस्या ए.बी.ने आरसीबीच्या ट्विटवर हँडलवर शेअर केलेल्या मुलाखतीत मांडली आहे आणि ती समस्या म्हणजे उकाडा.

(हे वाचा-IPL 2020 : या सीझनमध्ये हे पाच खेळाडू करणार त्यांच्या कर्णधारापेक्षाही अधिक कमाई)

'मला अशा वातावरणाची सवय नाही, यामुळे मला चेन्नईतील कसोटी सामन्याची आठवण झाली, प्रचंड उकड्यात झालेला हा सामना आणि त्यात वीरेंद्र सेहवाग याने त्रिशतक ठोकले होते. आताच्या आयपीएलमध्ये प्रेक्षकांविना सामने होणार आहे.  त्यामुळे भारतातील प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या मैदानांची उणीव जाणवेल', असेही एबीने म्हटले आहे. खचाखच भरलेल्या चिन्नास्वामी स्टेडियमचीही त्याने आठवण काढली.

तो पुढे म्हणाला की, येथील दमट वातावरणाचाही सामना करावा लागेल, अशावेळी एनर्जी वाचवून ठेवणे हे मोठे आव्हान असेल. आयपीएलचे सामने हे शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार असतात. शेवटच्या पाच षटकांवर निकाल अवलंबून  असतो, आणि अशा स्थितीत सर्व खेळाडूंना त्यांची एनर्जी टिकवून ठेवावी लागणार आहे. कोरोनाच्या या संकटामुळे खूप मोठ्या विश्रांतीनंतर सर्व खेळाडू हे मैदानावर उतरत असल्याने अर्थातच उत्साही आहेतच, त्यामुळे नेहमीसारखाच चांगला व थरारक अनुभव मिळेल, अशी आशाही त्याने व्यक्त केली.

(हे वाचा-IPL 2020: हे 4 रेकॉर्ड रचण्यासाठी 'हिट'मॅन सज्ज, पूर्ण करणार षटकारांचे द्विशतक)

दरम्यान, डिव्हिलियर्स हा आयपीएलमधील सर्वाधिक स्फोटक फलंदाज म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र विराट कर्णधार असलेल्या आणि ए.बी. सारखा फलंदाज असतानाही आरसीबीला आयपीएलचा एकही हंगाम जिंकता आलेला नाही, त्यामुळे यंदा जेतेपद मिळविण्याची त्यांची धडपड असेल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 17, 2020, 11:49 AM IST

ताज्या बातम्या