ढाका, 04 मार्च : बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु आहे. यात पहिले दोन सामने बांगलादेशने जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. बांगलादेशच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली ती तमीम इकबालने. त्यानं फक्त 132 चेंडूत 158 धावा केल्या. या खेळीसह त्यानं बांगलादेशसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम केला.
बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 322 धावा केल्या. तर झिम्बाब्वेने प्रत्युत्तरादाखल खेळताना कडवी झुंज दिली. मात्र अखेरच्या क्षणी बांगलादेशने बाजी मारली. झिम्बाब्वेच्या तिरिपानो यानं 28 चेंडूत नाबाद 55 धावा करून सामना रोमहर्षक केला. पण त्याला संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आलं. झिम्बाब्वेला 50 षटकात 318 धावांपर्यंत मजल मारता आली.
शेवटच्या षटकात झिम्बाब्वेला 20 धावांची गरज होती. कर्णधार मोर्तझाने चेंडू अल अमीन हुसैनच्या हातात सोपवला. पहिल्या दोन चेंडूत दोन धावा दिल्या. यात एक गडीही बाद झाला. त्यानंतर स्ट्राइकला आलेल्या तिरिपानोने तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर षटकार मारून सामन्याची रंगत वाढवली. त्यानंतर पुढच्या दोन चेंडूवर मात्र त्याला फटका मारता आला नाही आणि बांगलादेशने चार धावांनी सामना जिंकला.
हे वाचा : कोण होणार टीम इंडियाचा सिलेक्टर? आगरकर नाही तर या 5 जणांची होणार मुलाखत
बांगलादेशकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या तमीम इक्बालचे दोन वर्षातील हे पहिलंच शतक आहे. खराब फॉर्ममुळे त्यानं क्रिकेमधून ब्रेक घेतला होता. तमीमने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत 7 हजार धावा केल्या असून अशी कामगिरी करणारा तो बांगलादेशचा पहिलाच फलंदाज आहे.
हे वाचा : Women T20 World cup : ...तर सेमीफायनल न खेळता टीम इंडिया थेट फायनलमध्ये धडकणार मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.