दुबई, 25 सप्टेंबर : चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्र सिंग धोनीनं (MS Dhoni) वय काही नसतं हे पुन्हा एकदा दाखवून दिले. दिल्लीविरुद्ध होत असलेल्या सामन्यात धोनीनं एका सेकंदाच्या आत एक जबरदस्त कॅच घेतला. हवेत डाईव्ह मारत धोनीनं दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला बाद केलं. धोनीचा हा कॅच यंदाच्या हंगामातील सर्वोत्कृष्ट कॅच पैकी एक असेल. दिल्ली विरुद्ध चेन्नई यांच्यात झालेल्या सामन्यात धोनीनं टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. मात्र दोघंही फलंदाज बाद झाल्यानंतर दिल्लीचा डाव गडगडला. अखेरच्या ओव्हरमध्ये कर्णधार श्रेयस अय्यर सॅम कुरनच्या गोलंदाजीवर मोठा शॉट खेळायला गेला. मात्र अय्यरचा बॅटचा संपर्क झाला नाही, बॅटचा एड्ज लागून चेंडू स्टम्पच्या मागे गेला. स्टम्पच्या मागे उभ्या असलेल्या धोनीनं क्षणाचाही विलंब न करता अय्यरला बाद केलं. वाचा- विराटचा पत्ता होणार कट, गंभीरनं सांगितलं कोण होणार टीम इंडियाचा पुढचा कर्णधार! 39 वर्षीय धोनीनं आणि एका सेकंदात 9 फूट उंच उडी मारत हा कॅच घेतला. हा कॅच पाहून चाहतेही हैराण झाले. धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, आजही धोनीचा फिटनेस जबरदस्त आहे. युवा खेळाडूंनाही लाजवेल अशी धोनीची फिटनेस आहे. श्रेयस अय्यर आधी धोनीनं पृथ्वी शॉला स्टम्पिंग आऊट केले. वाचा- विराटचा पत्ता होणार कट, गंभीरनं सांगितलं कोण होणार टीम इंडियाचा पुढचा कर्णधार! दिल्लीकडून युवा फलंदाज पृथ्वी शॉनं जबरदस्त फलंदाजी केली. पृथ्वीनं 43 चेंडूत 64 धावा केल्या. पृथ्वीच्या या खेळीच्या जोरावर दिल्लीनं 20 ओव्हरमध्ये 175 धावा करत चेन्नईला 176 धावांचे आव्हान दिले. तर, पंतने अखेरच्या ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.