स्पोर्ट्स

  • associate partner

मुंबई, चेन्नई नाही तर 'हा' संघ होणार IPL 2020 चॅम्पियन! दिग्गज खेळाडूने केली भविष्यवाणी

मुंबई, चेन्नई नाही तर 'हा' संघ होणार IPL 2020 चॅम्पियन! दिग्गज खेळाडूने केली भविष्यवाणी

विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्याकडे पाहिले जात आहे. मात्र एक माजी क्रिकेटपटूने हे दोन संघ नाही तर दुसराच संघ आयपीएल जिंकू शकतो अशी भविष्यवाणी केली आहे.

  • Share this:

दुबई, 14 सप्टेंबर : आयपीएलच्या (IPL 2020 ) तेराव्या हंगामाला पाच दिवसांनी सुरुवात होत आहे. 19 सप्टेंबरपासून सुरू होणारी ही स्पर्धा यंदा युएइमध्ये होणार आहे. दरम्यान सध्या सर्व संघ कसून सराव करत आहे. असे असले तरी विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्याकडे पाहिले जात आहे. मात्र एक माजी क्रिकेटपटूने हे दोन संघ नाही तर दुसराच संघ आयपीएल जिंकू शकतो अशी भविष्यवाणी केली आहे.

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन आयपीएलच्या कॉमेंट्र पॅनलमध्ये आहे. यासाठी नुकताच तो युएइ पोहचला. येथे आल्यानंतर पीटरसननं आपला आवडता संघ कोणता आहे हे सांगितले. पीटरसनच्या मते यंदा दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएल जिंकू शकतो. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात अनेक युवा खेळाडू आहेत. पीटरसनच्या मते, दिल्ली आयपीएलच्या विजेतेपदासाठी दावेदार आहे. श्रेयस अय्यर कर्णधार म्हणून मजबूत आहे, त्यामुळे त्याच्या नेतृत्वाखाली संघ नक्कीच जिंकू शकतो. दिल्ली कॅपिटल्सचा संघ गेल्या वर्षी प्ले ऑफमध्ये पोहचला होता. मात्र त्यांना एकदाही विजय मिळवता आला नाही आहे.

वाचा-रोहित शर्माची चिंता वाढली, मुंबई इंडियन्सची 'ही' बाजू अजूनही कमकुवतच!

दिल्ली कॅपिटल्समध्ये अनुभवी खेळाडूंचाही समावेश

संघात पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिखर धवन यांसारखे जबरदस्त फलंदाज तर, सर्वात जास्त विकेट घेणारा अमित मिश्रा, अक्षर पटेल यांसारखे गोलंदाजही आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा संघ 20 सप्टेंबरपासून किंग्ज इलेव्हनपंजाब विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. दिल्लीकडू फलंदाजीची मदार युवा खेळाडू ऋषभ पंतवर असेल. पंतने गेल्या दोन हंगामात 45.07च्या सरासरीने 1172 धावा केल्या आहेत. तर, गोलंदाजीमध्ये कागिसो रबाडाच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल. रबाडाने गेल्या हंगामात 25 विकेट घेतल्या होत्या.

वाचा-मुंबईकर अजिंक्य राहणेला दिल्ली कॅपिटल्स खेळवणार नाही? प्लेइंग इलेव्हनवरून पेच

अशी असेल प्लेइंग इलेव्हन

दिल्ली संघाकडे धवन आणि शॉच्या रुपाने आधाची सलामी जोडी आहे. त्यात बदल केले जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे जर रहाणेला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरवल्यास कर्णधार अय्यर आणि ऋषभ पंत यांना चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागेल. संघाकडून सहाव्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा फलंदाज शिमरोन हेटमायर फलंदाजी करू शकतो. तर, सातव्य क्रमांकासाठी दोन अष्टपैलू खेळाडू आहेत. किमो पॉल आणि मार्कस स्टोइनिस. तर संघात तीन गोलंदाज असतील. यात अश्विन आणि अमित मिश्रा यांचे स्थान पक्के असेल. तर कागिसो रबाडा आणि इशांत शर्मा या दोन जलद गोलंदाजांना संघात संधी मिळू शकते.

Published by: Priyanka Gawde
First published: September 14, 2020, 2:16 PM IST

ताज्या बातम्या