रिकी पाँटिंगने शोधला पंतला पर्याय, 'हा खेळाडू ठरेल मॅच विनर'

रिकी पाँटिंगने शोधला पंतला पर्याय, 'हा खेळाडू ठरेल मॅच विनर'

सध्याचा यष्टीरक्षक पंतला दुखापत झाली तर हा खेळाडू त्याच्या जागी खेळू शकतो. तो सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडेल असंही पाँटिंग म्हणाला.

  • Share this:

मेलबर्न, 25 डिसेंबर : गेल्या आठवड्यात इंडियन प्रिमियर लीगच्या तेराव्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या रिकी पाँटिंगने संघात पंतसाठी पर्याय शोधला आहे. पाँटिंगने म्हटलं आहे की, लिलावात खरेदी केलेला अॅलेक्स कॅरी हा चौथ्या क्रमांकावर खेळून संघाला विजय मिळवून देऊ शकतो. तो ऋषभ पंतसाठी यष्टीरक्षक म्हणून बॅकअपही होऊ शकतो. बिग बॅश लीगमध्ये सलामीला खेळणाऱ्या कॅरीने सोमवारी झालेल्या सामन्यात 24 चेंडूत 55 धावांची खेळी केली. त्यावेळी पाँटिंग समालोचन करत होता.

पाँटिंग म्हणाला की, सध्या कॅरी जी भूमिका पार पाडत आहे त्यामुळे मला आणि दिल्ली कॅपिटल्सला प्रभावित केलं आहे. तो चांगला खेळाडू आहे. शांतपणे खेळतो. मला वाटतं की पुढच्या वर्षी तो अनेक सामन्यात विजय मिळवून देईल.

दिल्ली कॅपिटल्समध्ये पंतकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी आहे. पाँटिंग म्हणाला की, 'सध्याचा यष्टीरक्षक पंतला दुखापत झाली तर कॅरी त्याच्या जागी खेळू शकतो.' कॅरी ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप संघातही होता. आयपीएलमध्ये मात्र तो पदार्पण करणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्याला 2 कोटी 40 लाख रुपयांत खरेदी केलं आहे.

अॅलेक्स कॅरीला ऑस्ट्रेलियात पुढचा मायकल हस्सी असंही म्हटलं जातं. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 40 च्या सरासरीने तर टी20मध्ये 135 च्या स्ट्राइक रेटने धावा काढल्या आहेत. बिग बॅश लीगमध्ये कॅरीने दोन सामन्यात 45 आणि 55 धावा काढल्या.

ऋषभ पंतची कामगिरी मात्र अद्यापही म्हणावी तशी चमकदार झालेली नाही. विंडिजविरुद्धच्या मालिकेत त्यानं पहिलं शतक झळकावलं तर बेजबाबदार फटका खेळून तो बऱ्याचदा बाद झाला आहे. त्याच्या या बेजबाबदारपणावरून अनेक दिग्गजांनी सल्ला दिला आहे.

IPLच्या तारखेनं उडवली आठही संघांची झोप, दिग्गज खेळाडू घेणार माघार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2019 09:30 AM IST

ताज्या बातम्या