हैदराबाद, 12 मे : मुंबईनं प्रथम टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र आता रोहितचा हा निर्णय त्याच्या अंगीशी येणार की काय अशी चिंता मुंबईला सतावत आहे. दरम्यान पहिल्या दोन ओव्हरमध्ये संयमी फलंदाजी केल्यानंतर मुंबईकडून सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक यांनी आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. मात्र त्यानंतर तीसऱ्या ओव्हरमध्ये दीपक चहरची डीकॉकनं चांगलीच शाळा घेतली. तीन षटकार खेचत या ओव्हरमध्ये 20 धावा केल्या. तर, पुढच्या ओव्हरमध्ये धोनीनं शार्दुल ठाकुरच्या हातात चेंडू दिला. त्याचंही स्वागत डीकॉकनं षटकारासह केलं. मात्र, पुढच्याच चेंडूवर शार्दुलनं डीकॉकला माघारी धाडलं. सलामीवीर क्विंटन डीकॉक 17 चेंडूत 29 धावा करत बाद झाला. शार्दुल ठाकुरच्या 4 चेंडूवर षटाकार खेचल्याचा बदला शार्दुलनं घेतला अन् पुढच्याच चेंडूत डी कॉक बाद झाला.
दरम्यान, शार्दुल ठाकूरच्या 4 ओव्हरमध्ये डी कॉक बाद झाल्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये धोनीनं एक स्मार्ट डाव खेळला. त्याच्या या जाळ्यात रोहित शर्मा अडकला आणि दीपक चहरनं रोहितला बाद केलं. त्यामुळं पाच ओव्हरमध्येच सलामीचे फलंदाज माघारी परतले. रोहित 15 धावा करत बाद झाला. धोनीनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 20 धावा चोपलेल्या दीपकला पुन्हा गोलंदाजी दिली. आणि या ओव्हरमध्ये धोनीचं हे नाणं खणखणीत वाजलं. एकही धावा न देता रोहितला दीपकनं बाद केलं. मागच्या सामन्यातही चहरनं रोहितची विकेट घेतली होती. त्यामुळं धोनीच्या या जाळ्यात रोहित अडकला आणि सपशेल झाला. यामुळं पॉवर प्लेमध्ये मुंबईचे सलामीवीर केवळ 45 धावा करत बाद झाले.
Oh Cherry! Sweet Cherry!
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 12, 2019
Wicket Maiden to end the powerplay! MI - 45/2!#WhistlePodu #Yellove #IPL2019Final #CSKvsMI
दरम्यान या सामन्यात रोहितची विकेट घेत, धोनी आयपीएलमधला सर्वात यशस्वी विकेटकिपर बनला आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्यानं 132वेळा फलंदाजांना माघारी धाडलं आहे. दुसरीकडं रोहितनं यंदाच्या आयपीएलमध्ये 101च्या स्ट्राईकनं 229 धावा केल्या आहेत. यात केवळ एका अर्धशतकाचा समावेश आहे.
MS Dhoni's involvement in getting rid of both the #MumbaiIndians openers takes him to 132 dismissals in #VIVOIPL - setting a new record.#MIvCSK pic.twitter.com/dACuk70Akw
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2019
दरम्यान, हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर आतापर्यंत तीन वेळा 200चा आकडा पार करण्यात आला. सनरायजर्स हैदराबादचे होम ग्राऊंड असलेल्या या मैदानावर एकूण 8 सामने खेळले गेले. यात तीन सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानं तीन वेळा 200चा आकडा पार केला. दरम्यान या हंगामात मुबई इंडियन्सनं या मैदानावर 137 धावा केल्या होत्या. तर, या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघाला केवळ 96 धावांत बाद करत सामना जिंकला होता.
वाचा- मुंबईच्या विजेतेपदासाठी धोनीचा 'चॅम्पियन' उतरणार मैदानात?
वाचा- MI vs CSK : ‘या’ खेळाडूचा वाढदिवस मुंबईसाठी ठरणार लकी ?
वाचा- 'शर्माजी का बेटा' फायनलसाठी चेन्नईचा 'लक फॅक्टर' ठरणार?
SPECIAL REPORT: 'पोरांची पोटं दुखतात पण तरी मिळेल ते किडे पडलेलं पाणी प्यावं लागतं'