'शर्माजी का बेटा' फायनलसाठी चेन्नईचा 'लक फॅक्टर' ठरणार?

'शर्माजी का बेटा' फायनलसाठी चेन्नईचा 'लक फॅक्टर' ठरणार?

मुंबईविरुद्ध अंतिम सामन्यात चेन्नई आपल्या संघात बदल करू शकते. गेल्या तीन वर्षांत तीन संघांना आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या या खेळाडूला संधी मिळणयाची शक्यता.

  • Share this:

मुंबई, 11 मे : आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये हा सामना रविवारी होईल. चेन्नई आणि मुंबई यांच्यातील साखळी फेरीतील सामना सुद्धा हायव्होल्टेज झाला. त्यानंतर आता या दोन बलाढ्य संघांची लढत फायनलला होणार असल्याने त्याबाबत उत्सुकता वाढली आहे. दोन्ही संघ चौथ्यांदा विजेता होण्यासाठी मैदानात उतरतील.

मुंबईचा संघ संतुलित असून यंदाच्या हंगामात त्यांना विजेतेपदाचे दावेदार मानलं जात आहे. तर दुसरीकडे आठवेळा फायनलला पोहोचलेल्या चेन्नईची फलंदाजी थोडी कमकुवत आहे. धोनीने नेतृत्व कौशल्याच्या जोरावर संघात वेळोवेळी बदल करून फायनलला धडक मारली. अंतिम सामन्यात धोनी संघात बदल करू शकतो. हैदराबादची खेळपट्टी पाहता शार्दुल ठाकुरच्या जाही मुरली विजयला संघात घेतलं जाऊ शकतं. शार्दुल ठाकुरला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने एका षटकात 13 धावा दिल्या. यात त्याला एकाही फलंदाजाला बाद करता आलं नाही.

हैदराबादची खेळपट्टी संथ असल्यास नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला जाईल. यानंतर धावांचा पाठलाग करताना फलंदाज म्हणून मुरली विजय उपयुक्त ठरू शकतो. मात्र, सध्या संघातील सलामीवीरांचा फॉर्म पाहता मुरली विजयला संधी देतील असे वाटत नाही.

शार्दुल ठाकुरच्या जागी कोणाला घ्यायचं यासाठी मोहित शर्मा पर्याय ठरू शकतो. संथ खेळपट्टीवर मध्यमगती गोलंदाज मोहित शर्मा उपयुक्त ठरू शकेल. संथ खेळपट्टीवर वेगवेगळ्या प्रकारे गोलंदाजी करण्यात मोहित शर्मा पटाईत आहे. दिपक चाहरच्या साथीला मोहित शर्माची गोलंदाजीत मदत फायद्याची ठरेल.

संथ खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत फिरकीपटू जास्त चांगले ठरतात. संघात सध्या हरभजन सिंग, इम्रान ताहिर हे फिरकीपटू आहेत. त्यांच्या जोडीला कर्ण शर्मा संघाला उपयुक्त ठरू शकतो.

विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांत कर्ण शर्मा ज्या संघांकडून खेळला आहे त्या संघांनी विजेतेपद पटकावलं आहे. त्यामुळे कर्ण शर्मा पुन्हा एकदा चेन्नईसाठी लकी ठरू शकतो. 2016 मध्ये हैदराबाद, 2017मध्ये मुंबई तर 2018 ला चेन्नईने विजेतेपद पटकावलं. यावेळी कर्ण शर्मा संघाचा भाग होता.

वाचा- IPL 2019 : 'हे' चार भारतीय खेळाडू ठरवतील फायनलचं भवितव्य

SPECIAL REPORT: रायगड: राज ठाकरे इफेक्ट शिवसेना खासदाराला हॅट्रीकपासून रोखणार का?

First published: May 12, 2019, 2:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading