Home /News /sport /

सिंगल आहेस का? चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नावर स्मृतीने दिलं 'हे' उत्तर

सिंगल आहेस का? चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नावर स्मृतीने दिलं 'हे' उत्तर

सिंगल आहे का, लव्ह Marriage की Arrange आणि life पार्टनर कसा हवा असे प्रश्नही चाहत्यांनी स्मृती मानधनाला विचारले.

    मुंबई, 03 एप्रिल : देशात कोरोनामुळे लॉकडाउन कऱण्यात आलं आहे. यामुळे जवळपास सगळेच लोक घरात अडकून पडले आहेत. खेळामुळे नेहमी व्यस्त असलेले खेळाडूसुद्धा आता घरात आहेत. या काळात ते कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. तर सोशल मीडियावरून चाहत्यांशी संवाद साधत आहेत. भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनानेसुद्धा सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. यामध्ये तिला प्रेमाबद्दल, लग्नाबद्दलही विचारण्यात आलं. यावरही स्मृतीने उत्तरं दिली आहेत. चाहत्यांनी तिला चित्रपटांत काम कऱण्यावरूनही प्रश्न विचारला. एका युजरनं म्हटलं की, तु चित्रपटात काम करशील का? तु सुंदर आहेस आणि अभिनेत्रीसारखा अभिनय करू शकतेस. यावर स्मृतीने हसत असलेला इमोजी टाकत म्हटलं की, मला नाही वाटत की मला पाहण्यासाठी कोणी थिएटरमध्ये येईल. म्हणून असं नाही होणार. स्मृतीला एका चाहत्यानं तु सिंगल आहेस का असा प्रश्न विचारला. त्यावर तिने मला माहिती नाही असं उत्तर दिलं आहे. लग्नाबद्दलही एका युजरनं प्रश्न विचारला आहे. तुला अॅरेंज मॅरेज करायचं आहे की लव्ह मॅरेज? यावर स्मृती म्हणते की, मला लव्ह अॅरेंज करणं आवडेल. लाइफ पार्टनरकडून तुला काय अपेक्षा आहेत असाही प्रश्न एका युजरनं स्मृतीला विचारला. या प्रश्नावर स्मृतीने लाइफ पार्टनरकडून दोन अपेक्षा असल्याचं सांगितलं. यात पहिली अपेक्षा त्यानं प्रेम करावं आणि दुसरी अपेक्षा त्यानं पहिली अपेक्षा पूर्ण करावी असं उत्तर स्मृतीने दिलं आहे. क्रिकेट मालिकेसाठी जेव्हा घराबाहेर बराच काळ राहतेस तेव्हा कुटुंबाची रिअॅक्शन कशी असते यावर स्मृतीने मजेशीर उत्तर दिलं आहे. ती म्हणाली की, माझं तोंड पाहून घरचे कंटाळले आहेत. ते आशा करत असतात की माझा पुढचा दौरा लवकरात लवकर यावा. हे मजा म्हणून पण आम्ही खूप छान वेळ घालवतो आणि नेहमी हसत खेळत असतो. हे वाचा : विराटनं टीम इंडियात खेळावं अशी धोनीची इच्छा नव्हती, माजी सिलेक्टरनी केला खुलासा
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket, Smriti mandhana

    पुढील बातम्या