मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /आईच्या निधनानंतर टीम इंडियाच्या क्रिकेटपटूचा मोठा निर्णय, तुम्हीही कराल सलाम!

आईच्या निधनानंतर टीम इंडियाच्या क्रिकेटपटूचा मोठा निर्णय, तुम्हीही कराल सलाम!

भारतीय महिला क्रिकेटची टीमची सदस्य  प्रिया पूनियाच्या (Priya Puniya) आईचं सोमवारी कोरोनामुळे निधन झाले. प्रियाची इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात निवड झाली आहे.

भारतीय महिला क्रिकेटची टीमची सदस्य प्रिया पूनियाच्या (Priya Puniya) आईचं सोमवारी कोरोनामुळे निधन झाले. प्रियाची इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात निवड झाली आहे.

भारतीय महिला क्रिकेटची टीमची सदस्य प्रिया पूनियाच्या (Priya Puniya) आईचं सोमवारी कोरोनामुळे निधन झाले. प्रियाची इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात निवड झाली आहे.

मुंबई, 19 मे: सध्या संपूर्ण देश कोरोना व्हायरस (coronavirus) विरुद्धची लढाई लढत आहे. या महामारीमुळे अनेकांनी आपली जवळच्या व्यक्ती गमावल्या आहेत. भारतीय क्रिकेटपटू देखील याला अपवाद नाहीत. काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. काही माजी खेळाडूंचं यामध्ये निधन झालं. तर काही जणांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनामुळे गमावले आहे. भारतीय महिला क्रिकेट टीमची सदस्य वेदा कृष्णमूर्तीनं (Veda Krishnamurthy) आई आणि मोठ्या बहिणीला कोरोनामुळे गमावले आहे. त्यानंतर काही दिवसांनीच महिला टीमची अन्य एक क्रिकेटपटू प्रिया पूनियाच्या (Priya Puniya) आईचं सोमवारी कोरोनामुळे निधन झाले.

इंग्लंड दौऱ्याच्या तयारीत असलेल्या प्रियाला आईच्या निधनामुळे मोठा धक्का बसला आहे. तिने सोशल मीडियावर (Social Media) एक भावुक पोस्ट (Emotional post) लिहून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचवेळी तिनं कर्तव्याला पहिलं प्राधान्य देत इंग्लंड दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझामधील एकमेव Covid लॅब उद्धवस्त

आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण इंग्लंड दौऱ्यावर जाणार असल्याचं प्रियानं सांगितलं आहे. प्रिया आता बायो-बबलमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईत जाणार आहे. मुंबईतील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर भारतीय पुरुष आणि महिला टीम एकत्र इंग्लंडला रवाना होणार आहेत.

लिसा स्थळेकरच्या आरोपांवर वेदा कृष्णमूर्तीचं उत्तर, BCCI ला म्हणाली...

प्रियाचा भावुक मेसेज

प्रियानं आईच्या आठवणीमध्ये लिहलं आहे की, " तू मला भक्कम राहण्यासाठी का सांगितलंस हे मला आज कळाले. तुला माहिती होतं की, एक दिवस तू गेल्यानंतर मला याची गरज पडणार आहे. आई, तुझी कमतरता नेहमी जाणवेल. आपल्यातील अंतर कितीही असलं तरी तू नेहमीच माझ्या जवळ आहेस, हे मला माहिती आहे. माझी मार्गदर्शक, माझी आई, मी तुझ्यावर कायम प्रेम करत राहील. आयुष्यातील काही सत्य स्वीकार करणे अवघड असते. तुझ्या आठवणी कधीही विसरणार नाही. तुझ्या आत्म्याला शांती मिळू दे." कोरोना व्हायरस खतरनाक असून सर्वांनी नियमांचं पालन करावं आणि काळजी घ्यावी असं आवाहन प्रियानं केलं आहे.

First published:

Tags: Coronavirus, Cricket, Viral post