advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / लिसा स्थळेकरच्या आरोपांवर वेदा कृष्णमूर्तीचं उत्तर, BCCI ला म्हणाली...

लिसा स्थळेकरच्या आरोपांवर वेदा कृष्णमूर्तीचं उत्तर, BCCI ला म्हणाली...

भारताची महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तीची (Veda Krishnamurthy) आई आणि बहिणीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आता वेदा कृष्णमूर्तीने बीसीसीआय (BCCI) आणि सचिव जय शाह (Jay Shah) यांचे आभार मानले आहेत.

01
भारताची महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तीची आई आणि बहिणीचा कोरोनामुळे मृत्यू झाला, यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू लिसा स्थळेकरने बीसीसीआयवर वेदाशी संपर्कही न केल्यामुळे टीका केली होती. पण आता वेदा कृष्णमूर्तीने बीसीसीआय आणि सचिव जय शाह यांचे आभार मानले आहेत. (Veda Krishnamurthy/Instagram)

02
वेदाच्या बहिणीचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर त्याच्या दोन आठवडे आधीच वेदाच्या आईलाही कोरोनामुळे जीव गमवावा लागला होता. या कठीण काळात आपल्याला साथ दिल्याबद्दल वेदाने बीसीसीआयला धन्यवाद दिले आहेत. (Veda Krishnamurthy/Instagram)

03
'मागचा महिना माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण होता. काही दिवसांपूर्वी माझ्याशी संपर्क करणाऱ्या बीसीसीआय आणि जय शाह यांचे धन्यवाद. कठीण काळात तुम्ही मला साथ दिलीत, यासाठी खूप खूप आभार,' असं ट्वीट वेदाने केलं. (Veda Krishnamurthy/Instagram)

04
निवड समितीने पुढच्या महिन्या इंग्लंडमध्ये होणाऱ्या टेस्ट आणि वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा केली. या टीममध्ये वेदाला स्थान मिळालं नाही. यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू लिसा स्थळेकरने दावा केला की, बीसीसीआयने वेदाशी संपर्कही केला नाही, तसंच तिला इंग्लंड दौऱ्यात निवडण्यात येणार नाही, हेदेखील तिला सांगण्यात आलं नाही. (Veda Krishnamurthy/Instagram)

05
लिसा म्हणाली, 'इंग्लंड दौऱ्यासाठी वेदाची निवड न करणं कदाचित योग्य असेल, पण करारबद्ध खेळाडू असूनही बीसीसीआयने तिला काहीही सांगितलं नाही, एवढंच नाही तर या कठीण काळाचा सामना ती कशी करत आहे, याबाबतही विचारणा करण्यात आली नाही.'

06
'एखादं सच्चं बोर्ड त्यांच्या खेळाडूंची काळजी करतं, फक्त खेळावरच लक्ष ठेवत नाही, त्यामुळे मी निराश आहे,' असं वक्तव्य लिसाने केलं होतं. (Lisa Sthalekar/Instagram)

  • FIRST PUBLISHED :
  • भारताची महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तीची आई आणि बहिणीचा कोरोनामुळे मृत्यू झाला, यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू लिसा स्थळेकरने बीसीसीआयवर वेदाशी संपर्कही न केल्यामुळे टीका केली होती. पण आता वेदा कृष्णमूर्तीने बीसीसीआय आणि सचिव जय शाह यांचे आभार मानले आहेत. (Veda Krishnamurthy/Instagram)

    MORE
    GALLERIES