मराठी बातम्या /बातम्या /विदेश /इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझामधील एकमेव Covid लॅब उद्धवस्त

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझामधील एकमेव Covid लॅब उद्धवस्त

इस्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel and Palestinian conflict)  यांच्यातील संघर्ष एक आठवड्यानंतरही सुरू आहे. इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात गाझामधील एकमेव कोव्हिड टेस्टिंग लॅब (Gaza Covid testing lab) उद्धवस्त झाली आहे.

इस्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel and Palestinian conflict) यांच्यातील संघर्ष एक आठवड्यानंतरही सुरू आहे. इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात गाझामधील एकमेव कोव्हिड टेस्टिंग लॅब (Gaza Covid testing lab) उद्धवस्त झाली आहे.

इस्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel and Palestinian conflict) यांच्यातील संघर्ष एक आठवड्यानंतरही सुरू आहे. इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात गाझामधील एकमेव कोव्हिड टेस्टिंग लॅब (Gaza Covid testing lab) उद्धवस्त झाली आहे.

गाझा, 19 मे: इस्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel and Palestinian conflict)  यांच्यातील संघर्ष एक आठवड्यानंतरही सुरू आहे. पॅलेस्टाईनमधील हमास (Hamas) या दहशतवादी संघटनेकडून इस्रायलच्या नागरी भागामध्ये रॉकेट हल्ले सुरु आहेत. त्याला उत्तर म्हणून इस्रायलकडून पॅलेस्टाईनमधील गाझामध्ये जोरदार हवाई हल्ले करण्यात येत आहेत. इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात गाझामधील एकमेव कोव्हिड टेस्टिंग लॅब (Gaza Covid testing lab) उद्धवस्त झाली आहे.

गाझामधील आरोग्य मंत्रालयानं  हवाई हल्ल्यामध्ये कोव्हिड लॅब उद्धवस्त झाल्याची माहिती दिली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाचा मोठा फटका गाझामधील सामान्य नागरिकांना बसला आहे.' इस्रायलनं नागरी भागात केलेल्या बॉम्ब हल्ल्यात आतापर्यंत 213 नागरिकांचा मृत्यू झाला असून यामध्ये 61 मुलांचा समावेश आहे. त्याचबरोबर या हल्ल्यात 1400 जण जखमी झाले आहेत,'  असा दावा आरोग्य मंत्रालयानं केला आहे.गाझामध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट हा जगात सर्वात जास्त म्हणजे 28 टक्के इतका आहे. गाझामधील हॉस्पिटल गेल्या 15 वर्षांपासून इस्रायलच्या निर्बंधांचा सामना करत आहेत.

संयुक्त राष्ट्रानं (UN) इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचं वर्णन मानवी संकट असे केले आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळे आतापर्यंत 40 हजार पॅलेस्टाईन नागरिकांनी स्थलांतर केले असून 2500 जणांनी त्यांचं घर गमावल्याची माहिती संयुक्त राष्ट्रानं दिली आहे.

इस्रायलचे नुकसान

पश्चिम आशियातील दोन शेजारी देशांमध्ये निर्माण झालेल्या अशांत परिस्थितीचा फटका इस्रायलला देखील बसला आहे. हमासच्या रॉकेट हल्ल्यात आतापर्यंत 12 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हमासनं एका कारखान्यावर केलेल्या रॉकेट हल्ल्यात थायलंडच्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. यापूर्वी हमासच्या रॉकेट हल्ल्ल्यात भारतीय नर्सचा मृत्यू झाला होता.

Explainer : पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आहे तरी काय? जाणून घ्या संपूर्ण इतिहास

इस्रायल आणि हमास यांच्यातील ताज्या संघर्षाची सुरुवात 10 मे रोजी झाली.  त्या दिवशी हमासनं जवळपास 3500 रॉकेट्सचा इस्रायलवर मारा केला होता. यापैकी बहुतेक रॉकेट इस्रायलच्या आयर्ड डोम या सुरक्षा यंत्रणांनी हवेतच नष्ट केली. मात्र काही रॉकेट इस्रायलच्या नागरी भागात पडली. त्यामध्ये काही नागरिकांचा मृत्यू झाला तसंच इस्रायलचं मोठे आर्थिक नुकसान झाले. या रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलनं गाझामधील हमासच्या तळांवर हवाई हल्ले सुरु केले.

First published:

Tags: Covid-19, Israel, Palestinian, World news