• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • भारतीय खेळाडूकडून गोव्यात झाली चूक; रंगेहाथ पकडल्यानंतर भरावा लागला दंड

भारतीय खेळाडूकडून गोव्यात झाली चूक; रंगेहाथ पकडल्यानंतर भरावा लागला दंड

भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूकडून गोव्यात एक चूक झाली आहे. रंगेहाथ पकडल्यानंतर त्याला दंड भरावा लागला आहे.

 • Share this:
  पणजी, 29 जून: बर्‍याचदा कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसणारा भारतीय क्रिकेट संघाचा (Indian cricket team) माजी क्रिकेटपटू (Former cricketer) अजय जडेजा (Ajay Jadeja) सध्या त्याला भराव्या लागलेल्या दंडामुळे (Fine) चर्चेत आला आहे. उत्तर गोव्याच्या एल्डोना गावातील रस्त्यावर कचरा फेकल्याबद्दल त्याला 5,000 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड गावच्या सरपंचांकडून ठोठावला आहे. जडेजानं कोणतीही तक्रार न करता आपल्या चुकीसाठी दंड भरला आहे. त्याचबरोबर अशीच चूक पुन्हा होणार नाही, असंही त्यानं सरपंचांना सांगितलं आहे. जडेजानं कोणताही आव न आणता आपली चूक कबुल करून माफी मागितल्यानं सरपंचानंही त्याच कौतुक केलं आहे. 'टाइम्स नाऊ'ने दिलेल्या वृत्तानुसार, गावच्या सरपंच तृप्ती बांदोदकर यांनी सांगितलं की, 'गावात मोठ्या प्रमाणात इकडे तिकडे टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे आम्ही ग्रामस्थ आधीपासूनच त्रस्त आहोत. बाहेरून येणाऱ्या लोकांकडून या गावात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. त्यामुळे आम्ही कचरा टाकणाऱ्या नागरिकांची ओळख पटावी, यासाठी एक यंत्रणा तयार करण्यात आली आहे. या व्यवस्थेनुसार गावातील काही तरुणांना कचरा पिशव्या गोळा करण्याबरोबरच दोषींची ओळख पटवण्याचं काम दिलं आहे. त्यासाठी पुरावेही गोळा करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. सरपंच बांदोदकर यांनी पुढं सांगितलं की, 'आम्हाला कचर्‍याच्या काही पिशव्यांत अजय जडेजाच्या नावानं बिलाच्या पावत्या सापडल्या आहेत. या पुराव्याच्या आधारे आम्ही त्याला दंड आकरला आहे. 90 च्या दशकात लोकप्रिय झालेल्या या क्रिकेटपटूनं कोणतीही तक्रार न करता दंडाची रक्कम भरली आहे. असा लोकप्रिय क्रिकेटपटू आमच्या गावात राहतो, याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु अशा लोकांनी कचऱ्याच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. हेही वाचा-IND vs ENG : रोहित-रहाणे बायो-बबलमधून बाहेर, एका खेळाडूने सोडलं इंग्लंड अजय जडेजानं आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण 15 कसोटी सामने खेळले आणि ज्यामध्ये त्यानं 576 धावा केल्या आहेत. तर अजय जडेजानं 196 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत 6 शतकं आणि 30 अर्धशतकांसह 5359 धावा केल्या आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: