वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल गमावल्यानंतर आता भारतीय टीमसमोर इंग्लंडविरुद्धच्या सीरिजचं कठीण आव्हान आहे. या सीरिजमध्ये एकूण 5 सामने होणार आहेत. त्याआधी भारतीय टीमला 20 दिवसांची सुट्टी मिळाली आहे, त्यामुळे भारतीय खेळाडू बायो-बबलमधून बाहेर आले आहेत आणि इंग्लंडमध्ये भटकंती करत आहेत.
रोहित शर्माने सोमवारी एक फोटो शेयर केला, यात तो आपली मुलगी समायरा आणि पत्नी रितीकासोबत फिरत आहे. (Photo- Rohit Sharma Instagram)
रोहित शर्मासोबत अजिंक्य रहाणेचंही कुटुंब आहे. अजिंक्यची पत्नी राधिका आणि मुलगी आर्या इंग्लंडच्या रस्त्यावर फिरताना दिसले. (Photo- Ajinkya Rahane Instagram)
इशांत शर्मा आणि मयंक अग्रवाल त्यांच्या पत्नीसोबत सॅलिसबेरीमधलं स्टोनहेंज बघायला गेले. मेगालिथ म्हणून ओळख असलेल्या या खडकांबाबतचं रहस्य अजूनही कायम आहे. या खडकांचा आकार 9 मीटर आणि वजन 25 टन आहे. (Photo- Ishant Sharma Instagram)
ऑफ स्पिनर आर.अश्विनही कुटुंबासोबत समुद्र किनाऱ्यावर गेला. त्याचा व्हिडिओ पत्नी प्रिती नारायणनने शेयर केला आहे. (R Ashwin Instagram grab)
कर्णधार विराट कोहलीही त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत नाश्ता करताना दिसला. विराटच्या हातात कप होता, तर अनुष्का काहीतरी खात होती. (Virat Kohli Instagram)
ऑलराऊंडर अक्षर पटेल तर इंग्लंडमधूनच बाहेर गेला आहे. अक्षर स्कॉटलंडमध्ये गवताच्या मैदानामध्ये दिसला. (Axar Patel Instagram)
दिलीप वेंगसरकर यांनी काहीच दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या या सुट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. खेळाडूंना एवढी मोठी सुट्टी कशी देण्यात आली, असं वेंगसकरांनी विचारलं. (AFP & Dilip Vengsarkar Facebook)
भारतीय क्रिकेट टीम 14 जुलैला पुन्हा एकत्र येणार आहे आणि 4 ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे.