Home /News /sport /

'तू माझी...' संजनाच्या वाढदिवशी बुमराहच्या गोड शुभेच्छा, पाहा Photo

'तू माझी...' संजनाच्या वाढदिवशी बुमराहच्या गोड शुभेच्छा, पाहा Photo

टीम इंडियातली नुकताच लग्न झालेला फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहची (Jaspreet Bumrah) बायको संजना गणेशन (Sanjana Ganesan) हिचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त बुमराहनं बायकोवरील प्रेम दाखवणारा एक गोड फोटो शेअर केला आहे.

    मुंबई, 6 मे: टीम इंडियातली नुकताच लग्न झालेला फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहची (Jaspreet Bumrah) बायको संजना गणेशन (Sanjana Ganesan) हिचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त बुमराहनं बायकोवरील प्रेम दाखवणारा एक गोड फोटो शेअर केला आहे. बुमराहनं शेअर केलेल्या फोटोत संजना त्याच्या गालावर Kiss करत आहे. हा फोटो शेअर करत म्हंटलं आहे की, ' माझं रोज ऱ्हदय चोरणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू माझी आहेस. आय लव्ह यू (I Love You) बुमराहचं हे ट्विट आणि नव्या जोडप्याचा हा गोड फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे. जसप्रीत बुमराहनं लग्नाच्या कारणामुळे भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) मालिकेतून माघार घेतली होती.  संजना लग्नानंतर 10 दिवसांनी कामावर परतली. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या वनडे आधी स्टार स्पोर्ट्सवर संजनाने शोचं एँकरिंग केलं, यावेळी संजनासोबत व्हीव्हीएस लक्ष्मण आणि इरफान पठाणही  होते. संजना स्पोर्ट्स एँकर आहे आणि स्टार स्पोर्ट्सच्या टीमचा भाग आहे. बुमराह आणि संजना यांनी 15 मार्चला गोव्यात लग्न केलं, यानंतर गुरुद्वारामध्ये विधी पार पडले. कोरोनामुळे या लग्न सोहळ्याला दोघांच्या कुटुंबामधली फक्त 20 जण उपस्थित होती. कोण आहे संजना गणेशन? संजनाने आयपीएल आणि 2019 वर्ल्ड कपमध्ये एँकरिंग केलं आहे. तसंच ती कोलकाता नाईट रायर्डस या आयपीएलच्या टीमसाठीही एँकरिंग करते. संजनाने एमटीव्हीचा रियलिटी शो स्पिल्ट्स व्हिलामधून टीव्हीवर पदार्पण केलं. 2013 साली तिने फेमिना गॉर्जियस हा पुरस्कार जिंकला होता. पुण्याच्या सिम्बोयसिस इन्स्टिट्यूटमधून संजनाने इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं, पण यानंतर ती मॉडेलिंगच्या क्षेत्रात वळली. 2014 साली ती मिस इंडियाच्या फायनलपर्यंत पोहोचली होती. '....मी तेव्हा आईसमोर रडत होतो,' चेतेश्वर पुजारानं सांगितला 'तो' अनुभव लग्नानंतर जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सच्या टीमकडून आयपीएलमध्ये खेळला. आता आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानं बुमराहला बायकोचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस निवांत साजरा करण्याची संधी मिळाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Birthday celebration, Jasprit bumrah, Photo viral, Sanjana ganesan

    पुढील बातम्या