'....मी तेव्हा आईसमोर रडत होतो,' चेतेश्वर पुजारानं सांगितला 'तो' अनुभव

'....मी तेव्हा आईसमोर रडत होतो,' चेतेश्वर पुजारानं सांगितला 'तो' अनुभव

टीम इंडियाचा टेस्ट स्पेशालिस्ट बॅट्समन चेतेश्वर पुजारानं (Cheteshwar pujara) नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी काय करतो याचं रहस्य सांगितलं आहे. त्याचबरोबर आपण आईसमोर कधी रडलो याचा खुलासा केला आहे.

  • Share this:

मुंबई, 6 मे : टीम इंडियाचा टेस्ट स्पेशालिस्ट बॅट्समन चेतेश्वर पुजारानं (Cheteshwar pujara) नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी काय करतो याचं रहस्य सांगितलं आहे. "आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दबाब सहन करावा लागतो. एकदा नकारात्मक विचार केला की नकारात्मक वाटू लागतं, त्यामुळे मी रोज ध्यान आणि योगासनं करतो. तसंच रोज प्रार्थना करतो. त्यामुळे माझ्या मनामध्ये कायम सकारात्मक विचार असतात." असं पुजारानं सांगितलं. एका यूट्यूब (YouTube) चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो बोलत होता.

...मी आईसमोर रडत होतो

"मी तरुण होतो तेव्हा हा सर्व दबाब सहन करु शकेल असं मला वाटत नव्हतं.  त्यामुळे मी तरुणपणी आईसमोर रडत असे, या दबावामुळे मी क्रिकेट खेळू शकत नाही,''असं मी आईला सांगितलं होतं, आता मी तो दबाव सहन करु शकतो.'' असा अनुभन पुजारानं सांगितला आहे.  पुजारा 17 वर्षांचा होता तेंव्हा त्याच्या आईचं निधन झालं. त्यानंतर तो अध्यात्मिक गुरुचा सल्ला घेतो. 33 वर्षांच्या पुजारानं 85 टेस्टमध्ये 6244 रन केले आहेत.

मनाची दिशा योग्य हवी

पुजारानं यावेळी सांगितलं की, "मन हे सर्वात महत्त्वाचं आहे. मनाची दिशा स्पष्ट नसेल तर तुम्ही नेहमी संभ्रमात असता. तुम्ही मनापासून आनंदी असाल तर समाधानी आयुष्य जगू शकता. मनातील विश्वास हा खेळाप्रमाणेच आयुष्यातही महत्त्वाचा असतो असं पुजारानं सांगितलं. पुढील महिन्यात न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये चांगली कामगिरी करण्याचा विश्वास पुजारानं व्यक्त केला आहे.

IPL 2021 : या देशाचे खेळाडू भारतात राहून टीम इंडियाविरुद्धच करणार तयारी!

चेतेश्वर पुजाराला या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) करारबद्ध केलं होतं. तो 2014 नंतर पहिल्यांदाच आयपीएल लिलावात सहभागी झाला होता. यापूर्वी आयपीएल लिलावात कोणत्याही टीमनं माझ्यासाठी बोली लावली नव्हती. तो माझ्यासाठी धक्का होता. त्यानंतर काही गोष्टी माझ्या नियंत्रणात नाहीत, हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे मी क्रिकेटमधील सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करु लागलो." असं पुजारानं सांगितलं.

Published by: News18 Desk
First published: May 6, 2021, 9:50 AM IST

ताज्या बातम्या