Home /News /sport /

IPL गाजवली आता T20 लीगसाठी सज्ज, भारताचे दोन फास्ट बॉलर ऑस्ट्रेलियात खेळणार!

IPL गाजवली आता T20 लीगसाठी सज्ज, भारताचे दोन फास्ट बॉलर ऑस्ट्रेलियात खेळणार!

भारताचे दोन फास्ट बॉलर चेतन सकारिया (Chetan Sakariya) आणि मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 मॅक्स टुर्नामेंटच्या सुरूवातीच्या सत्रात खेळणार आहेत.

    ब्रिस्बेन, 22 जुलै : भारताचे दोन फास्ट बॉलर चेतन सकारिया (Chetan Sakariya) आणि मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 मॅक्स टुर्नामेंटच्या सुरूवातीच्या सत्रात खेळणार आहेत. आयपीएलमध्ये (IPL 2022) चेतन सकारिया राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) तर मुकेश चौधरी चेन्नई सुपर किंग्सकडून (CSK) खेळला. हे दोन्ही खेळाडू एमआरएफ पेस फाऊंडेशन आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या अदान-प्रदान कार्यक्रमाअंतर्गत ब्रिस्बेनमध्ये जातील. टी-20 मॅक्स टुर्नामेंट पुढच्या महिन्यात खेळवली जाणार आहे. 'एमआरएफ पेस फाऊंडेशन आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळाडू आणि कोचिंगची अदान-प्रदान प्रक्रिया 20 वर्षांपासून सुरू आहे. मागच्या काही वर्षांत कोरोनामुळे ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती. पण आता या दोन भारतीय खेळाडूंसोबत पुन्हा एकदा नव्याने सुरूवात होत आहे,' असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितलं. चेतन सकारियाने मागच्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी-20 मधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तर मुकशे चौधरीने आयपीएलच्या या मोसमात 13 सामन्यांमध्ये 16 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या स्पर्धेत सकारिया सनशाईन कोस्टसाठी तर मुकेश चौधरी विन्नम-मॅनलीकडून खेळतील. चेतन सकारिया आणि मुकेश चौधरी या टी-20 लीगशिवाय बुपा नॅशनल क्रिकेट सेंटरमध्येही ट्रेनिंग घेतील. टी-20 मॅक्स टुर्नामेंटला 18 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे, तर 4 सप्टेंबरला स्पर्धेची फायनल खेळवली जाईल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Australia, Ipl 2022

    पुढील बातम्या