‘मुंबई, 9 जुलै : लॉकडाऊननंतर बदललेल्या जगात फोन आणि इंटरनेट हे एकमेकांशी कनेक्ट राहण्याचे तसेच रोजच्या कामची महत्त्वाची साधनं आहेत. या दोन सेवा नीट नसतील तर रोजची कामं देखील होत नाहीत. अनेकांना याचा अनुभव आला आहे. भारताची महान धावपटू पी.टी. उषा (PT Usha) देखील याला अपवाद नाही. त्यामुळे उषा यांनी आपला 41 वर्ष जुना नंबर बंद करण्याचा इशारा दिला आहे. पीटी उषा यांनी ट्विट करत त्यांचा या बाबतचा अनुभव मांडला आहे. ‘BSNL च्या गेल्या काही महिन्यातील सर्विसमुळे मी हताश झाले आहे. माझा लँडलाईन नंबर आणि इंटरनेट दोन्हीला ही समस्या आहे. याबाबत मी अनेकदा तक्रार करुनही हा प्रश्न सुटलेला नाही. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर मी माझा 1980 पासून असलेला नंबर बंद करणार आहे’ असा इशारा उषा यांनी दिला आहे.
Disappointed with the service provided since last few months by @BSNL_KL. My land-line & internet are giving me lot of trouble. Despite many complaints the problem is not resolved. If this continues, I will discontinue the number which is there with me since 1980. @BSNLCorporate
— P.T. USHA (@PTUshaOfficial) July 9, 2021
उषा यांचे हे ट्विट चांगलेच व्हायरल (Viral) झाले आहे. भारताच्या महान धावपटूनं वारंवार विनंती करुनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बीएसएनएलच्या प्रशासनावर सोशल मीडियावर नाराजी व्यक्त होत आहे. IND vs ENG : 2 वर्ष 7 महिन्यात एकही शतक नाही, टीम इंडियाच्या कॅप्टननं फोडलं कोरोनावर खापर भारताची ‘गोल्डन गर्ल’ म्हणून पीटी उषा यांची ओळख आहे. 1984 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये सेकंदापेक्षा काही फरकाने त्याचं ब्राँझ मेडल हुकलं होतं. 1986 साली सेऊलमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत उषा यांनी 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळवलं होतं. उषा यांनी त्या स्पर्धेतील प्रत्येक प्रकारात रेकॉर्डची नोंद केली होती. निवृत्तीनंतर त्या केरळमध्ये नवे खेळाडू घडवण्याची अकादामी चालवत आहेत.