मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : 2 वर्ष 7 महिन्यात एकही शतक नाही, टीम इंडियाच्या कॅप्टननं फोडलं कोरोनावर खापर

IND vs ENG : 2 वर्ष 7 महिन्यात एकही शतक नाही, टीम इंडियाच्या कॅप्टननं फोडलं कोरोनावर खापर

भारत विरुद्ध इंग्लंड (IND W vs ENG W) यांच्यातील टी20 मालिकेला आजपासून (शुक्रवार) सुरुवात होत आहे. टीम इंडियाच्या कॅप्टननं खराब फॉर्मचं खापर कोरोनावर फोडलं आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड (IND W vs ENG W) यांच्यातील टी20 मालिकेला आजपासून (शुक्रवार) सुरुवात होत आहे. टीम इंडियाच्या कॅप्टननं खराब फॉर्मचं खापर कोरोनावर फोडलं आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड (IND W vs ENG W) यांच्यातील टी20 मालिकेला आजपासून (शुक्रवार) सुरुवात होत आहे. टीम इंडियाच्या कॅप्टननं खराब फॉर्मचं खापर कोरोनावर फोडलं आहे.

लंडन, 9 जुलै : भारत विरुद्ध इंग्लंड (IND W vs ENG W) यांच्यातील टी20 मालिकेला आजपासून (शुक्रवार) सुरुवात होत आहे. या मालिकेतील एकमेव टेस्ट भारतीय महिलांनी जोरदार खेळ करत ड्रॉ केली. त्यानंतरच्या वन-डे मालिकेत यजमानांनी 2-1 असा विजय मिळवला. आता टी20 मालिका जिंकून या दौऱ्याचा शेवट गोड करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. टीम इंडियाच्या टी20 टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौरचा (Harmanpreet kaur) खराब फॉर्म हा काळजीचा विषय आहे.

हरमनप्रीतनं या खराब फॉर्मला कोरोना आणि यावर्षी झालेल्या दुखापतीला जबाबदार धरलं आहे. 9 जुलैपासून सुरु होणाऱ्या मालिकेत फॉर्ममध्ये परत येऊ असा विश्वासही तिने व्यक्त केला आहे. भारताची आक्रमक बॅटर म्हणून हरमनप्रीतची ओळख आहे. 2017 साली झालेल्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये तिने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 171 रनची खेळी केली होती. मात्र त्यानंतर तिला मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तिला वन-डेमध्ये एकही शतक झळकावता आलेलं नाही. तसेच न्यूझीलंड विरुद्ध 2018 साली झालेल्या टी20 मध्ये शतक झळकावल्यानंतर हरमनप्रीतनं या प्रकारात एकदाही 50 रनचा टप्पा पार केलेला नाही.

हरमनप्रीतनं यावेळी बोलताना सांगितले की, 'मला रोज सराव करायला आवडतं. कोरोना आणि् दुखीापतीमुळे मला तयारीसाठी अधिक वेळ मिळाला नाही. मी कारण सांगत नाही, पण हेच सत्य आहे. मी लवकरच फॉर्मात परत येईल.' हरमनप्रीतनं मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेतून माघार घेतली होती. त्यानंतर तिला लगेच कोरोनाची लागण झाली. इंग्लंड विरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये तिने 4 आणि 8 रन काढले होते. तर वन-डे मालिकेत अनुक्रमे 1,19 आणि 16 रनची खेळी केली.

भारताविरुद्धच्या सीरिजपूर्वी श्रीलंकेच्या कॅप्टनची हकालपट्टी, ‘हा’ ऑल राऊंडर सांभाळणार जबाबदारी

भारतीय टीम : हरमनप्रीत कौर, स्मृती कौर, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्स, शेफाली वर्मा, रिचा घोष, हरलीन देओल, स्नेह राणा, तानिया भाटिया, इंद्राणी रॉय, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट, राधा यादव आणि सिमरन दिल बहादूर

First published:
top videos

    Tags: Cricket, India vs england, T20 cricket